Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाणे, रायगड मध्ये हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, सोलापुर लातुर मध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचे अंदाज
Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon Today Update:  हवामान विभागाच्या (IMD) अपडेट्सनुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगडसह (Raigad) कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा जोर पुढील 2-3 दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई (Mumbai Rains), ठाणे, रायगड मध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे. याशिवाय सोलापुर (Solapur), लातुर (Latur) मध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. कोकणात दिवसभर पावसाची संततधार असेल मात्र रात्री मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकणातील अंतर्गत भागात अधिक पाउस होउ शकतो.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नद्या व धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर, चांदोली आणि कोयना या तिन्ही धरणांमधून जवळपास 45 हजार क्यूसेक विसर्ग केला जाणार आहे. तसेच सध्या अलमट्टी धरणामधून विसर्ग सुरू आहे, पण जर पाऊस वाढला तर स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. रायगड आणि कोकण भागातही अनेक नद्यांंच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

के.एस होसाळीकर ट्विट

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाला असुन. यात मुंबई-70-100 मिमी, ठाणे-नवी मुंबईत 100-120 मिमी, रत्नागिरी मध्ये 71 मीमी पावसाची नोंद झाली आहे.