Coronavirus in Mumbai: मुंबईत आज 1430 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची व 38 मृत्यूची नोंद; शहरातील एकूण सकारात्मक प्रकरणे 31,789 वर
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

गेले काही दिवस मुंबई (Mumbai) मध्ये रोज कोरोना विषाणूचे (Coronavirus) 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आज मुंबईत 1430 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह केसेस आणि 38 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे शहरातील एकूण सकारात्मक प्रकरणे वाढून 31,789 आणि मृत्यूची संख्या 1026 झाली आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येचे प्रमाण पाहता बीकेसी आणि आता नेस्को येथे रेस कोर्सनंतर हजारो बेड तयार करण्यात आले आहेत. नायक हॉस्पिटलचे प्रभारी डॉक्टर आणि नेस्कोच्या प्रभारी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन चार दिवसात 60 बेड तयार होतील व 1000 बेड तयार करण्याची तयारी चालू आहे.

एएनआय ट्वीट -

मुंबईच्या धारावी भागात आज 42 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशाप्रकारे इथल्या एकूण रुग्णांची संख्या 1583 झाली आहे. आज या ठिकाणी मृत्यूची नोंद झाली नाही. महाराष्ट्रात आज 2436 नवे रुग्ण आढळून आले असून, 60 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्याचसोबत एकूण 1695 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आज एका दिवसात राज्यभरातून 1186 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक 900 रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 501 रुग्णांना घरी सोडले आहे. मुंबईमध्ये वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज नवे 2436 कोरोनाबाधित रुग्ण तर 60 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 52,667 वर पोहचला- आरोग्य विभाग)

दरम्यान, बीकेसी येथे एमएमआरडीने 15 दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (1000 बेड्सची सुविधा) उभारले आहे. या ठिकाणी 200 बेड्सची आयसीयू सुविधाही आहे. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. 600 बेड्सची सुविधा येथे आहे, व यात 125 बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड-19 ची मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे 7000 पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील 2 आठवड्यात उभारली जातील.