महाराष्ट्रात आज नवे 2436 कोरोनाबाधित रुग्ण तर 60 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 52,667 वर पोहचला- आरोग्य विभाग
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. तर कोरोना संबंधित आलेल्या ताजे आकडेवारी नुसार महाराष्ट्रात आज 2436 नवे रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्याचसोबत एकूण 1695 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांना सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

राज्यातील येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु राज्य सरकार कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सक्षम असून त्यासाठी तयारी सुरु करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा राज्यात कोरोनाचा वेग मंदावला जरी असला तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णांवर दिवस रात्र उपचार करत आहेत. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य पार पाडत आहेत.(BMC: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 1 हजार 583 कोरोनाबाधित; दिवसभरात 42 नव्या रुग्णांची नोंद)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची सद्यची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच कोरोनाबाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून क्वारंटाइन आणि विलगीकरण कक्ष सुद्धा उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती विविध ठिकाणची पाहून लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत.