BMC: मुंबईत एकूण 25 हजार 317 कोरोनाबाधित; दिवसभरात 1 हजार 382 नव्या रुग्णांची नोंद तर, 41 जणांचा मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही सकारात्मक बदल दिसून आला आहे. मुंबईत आज  1 हजार 382 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 41 जणांचा मृत्यू झाला आहे.  यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 317 वर पोहचली आहे. यापैंकी 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 751 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हे देखील वाचा- पालघर येथे आणखी 10 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण आकडा 434 वर पोहचला

एएनआयचे ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे.