Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus Cases In Mumbai: राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. आज मुंबईत (Mumbai) 1372 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (Corona Positive Patient) नोंद करण्यात आली असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची 81,634 वर पोहचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

सध्या मुंबईमधील 24,483 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 52,392 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय मुंबईमध्ये आतापर्यंत 4,759 जणांचा कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात आज कोरोनाचे 6,364 नवे रुग्ण,198 मृत्यू; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1,92,990 वर)

दरम्यान, आज राज्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये 6,364 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच 198 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1,92,990 वर पोहोचली आहे. आज नोंद करण्यात आलेल्या 198 मृत्यूंपैकी 150 मृत्यू हे मागील 48 तासातील असून 48 हे मागील 24 तासातील आहेत. आतापर्यंत राज्यातील 1,04,687 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सध्या 79,911 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत राज्यात 8,376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.