Coronavirus Update: महाराष्ट्रात आज कोरोनाचे 6,364 नवे रुग्ण,198 मृत्यू; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1,92,990 वर
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र कोरोना व्हायरस अपडेट 3 जुलै 2020 च्या नुसार आजच्या दिवसभरात राज्यात एकूण 6,364 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तसेच 198 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज रेकॉर्ड झालेल्या 198 मृत्यूंपैकी 150 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 48 हे मागील 24 तासातील आहेत. या नंतर राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 1,92,990 वर पोहचली आहे. यापैकी 1,04,687 रुग्ण हे डिस्चार्ज देण्यात आलेले आहेत तर सध्या 79,911 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजवर राज्यात कोरोनामुळे 8,376 मृत्यू झाले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. Covid-19 च्या वाढत्या संसर्गामुळे कलम 144 अंतर्गत मुंबई पोलिसांकडून नवी नियमावली जारी; पहा काय आहेत नवीन नियम

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचे आज नव्याने 8 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावी मधील कोरोनाबाधितांचा आकडा 2309 वर पोहचला असून आतापर्यंत 84 जणांचा बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सहित देशातील कोरोनाबाधितांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ANI ट्विट

दरम्यान, देशभरात आजवर 6,25,544 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 3,79,892 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर आजवर एकूण 18213 मृत्यू झाले आहेत. भारतात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 60.73 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.तसेच भारत बायोटेक निर्मित COVAXIN ही लस आता 15 ऑगस्ट ला लाँच होईल असे अंदाज आहेत.