Mahajobs Portal: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज लोकार्पण केलेल्या 'महाजॉब्स' (Mahajobs) या संकेतस्थळाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज केवळ 4 तासातच सुमारे 13 हजार 300 पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर 147 उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली आहे.
दरम्यान, राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. तसेच राज्यातील उद्योजकांनादेखील कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून महाजॉब्ज संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलचे लोकार्पण झाल्यानतंर त्याला केवळ चार तासात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या नागरिकांनी तसेच उद्योजकांनी http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 5368 नवे कोरोना बाधीत रुग्ण, तर 204 जणांचा मृत्यू)
महाजॉब्स संकेतस्थळाला मिळतोय प्रचंड प्रतिसाद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या #MahaJobsPortal वर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी केली नोंदणी. pic.twitter.com/ngR9W43Toh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 6, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. तसेच राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात अनेक उद्योग सुरू झाले आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार असून उद्योजकांना कुशल कामगार वर्ग मिळणं शक्य होणार आहे.