Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात (Maharashtra) 5368 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची (Corona Positive Patients) वाढ झाली आहे. तसेच 204 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,11,987 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरसमुळे 9,026 जणांचा बळी गेला आहे.

सध्या राज्यात 87,681 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोना रुग्णांमधील रिकव्हरीचे प्रमाण 54.37 टक्के आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. आज नवीन 3522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण 115262 रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. (हेही वाचा - महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी 'महा टूरिझम' मार्फत महा टॅगलाईन स्पर्धचे आयोजन)

आज राज्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. मुंबई पाठोपाठ ठाणे, पुणे, पालघर, औरंगाबाद आदी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 24,248 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 425 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 6,97,413 इतकी झाली आहे. यातील 2,53,287 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.