Representational Image (File Photo)

Kalyan Shocker : कल्याणमध्ये रविवारी एका 13 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली. त्याने सुसाईड नोटदेखील(Suicide Note) लिहीली होती. त्यात त्याने म्हटले की, त्याच्या शाळेतील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले होते. चिठ्ठीत त्यांच्यावर छेडछाड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्यामुळे तो दुःखी होता. प्रकरण समोर येताच शाळेने संबंधित शिक्षकावर कारवाई करत, त्याला बडतर्फ केले आहे. (हेही वाचा:Mumbai Police: बसस्टॉपवर बाईकवरून जीवघेणा स्टंट करणाऱ्यांना तरुणांना पडले महागात; मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल!)

विघ्नेश पात्रा असे मृत मुलाचे नाव असून, घटनेवेळी तो घरी एकटाच होता. आई-वडील, बहीण आणि तो असे कुटुंब आहे. रविवारी विघ्नेशला घरी सोडून बाकी सगळे सदस्य बाहेर गेले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याचे वडील परतले. त्यांनी दार ठोठावले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत घरात पाहिले असता त्यांना विघ्नेश लटकलेल्या अवस्थेत दिसला. तयानंतर वडील आणि शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि पोलिसांना बोलावले. विघ्नेशला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी विघ्नेशला मृत घोषित केले.

या घटनेत पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस मुलाचे पालक, वर्गमित्र आणि शिक्षकांची मुलाखत घेण्याची योजना आखत आहेत. मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सोमवारी शाळा व्यवस्थापनाला या घटनेची माहिती मिळताच संबंधित शिक्षकाला बडतर्फ केल्याचे जाहीर केले. शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी शाळेत दाखल होत शिक्षिकेने कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्याचा छळ केला नसल्याचा दावा केला.