मुंबईच्या रस्त्यांवर (Mumbai Street) स्टंट करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना सज्जड दम दिला आहे. पोलिसांच्या धाकानंतर या कृत्याची कबुलीही संबंधित तरुणाने व्हिडिओमार्फत दिली. बेस्ट बस स्टॉपच्या छतांवर धावणे, बाईक स्टंट करणे, वाहनांवर चढणे असे विविध स्टंटचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. हा व्हिडिओ अखेर पोलिसांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला असून यासंदर्भातील माहिती दिली आहे. (हेही वाचा - Mumbai Traffic Rules Violations: ई-बाईकविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांची विशेष कारवाई मोहीम; 1,176 उल्लंघन करणाऱ्यांकडून गोळा केला 1.63 लाख दंड)

आरोपीने त्याच्या मित्रांबरोबर स्टंटचे काही व्हिडिओ काढले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करण्यात आले. मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडिओत आरोपीने आपले कृत्य कबूल केले असून आपले म्हणणेही दिले आहे. आरोपीचे म्हणणे आहे की तो चेंबूर येथे राहतो आणि 4 जून रोजी पहाटे 3 वाजता तो आणि त्याचे मित्र दक्षिण मुंबईत होते. सायकलवर स्टंट करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यामुळेच आझाद मैदान पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

पाहा व्हिडिओ -

https://x.com/MumbaiPolice/status/1823211260508619126

दरम्यान, मुंबईतील अन्य एका कारवाईत, 9 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत संपूर्ण शहरात ई-बाईक विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत 1176 ई-बाईकवर कारवाई करण्यात आली आणि 1 लाख 63 हजार 400 रुपये किमतीचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांच्या विशेष मोहिमेदरम्यान 290 ई-बाईक जप्त केल्या असून 221 ई-बाईकवर गुन्हे दाखल केले आहेत.