Dharavi | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus In Dharavi: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात थैमान घातले आहे. यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आढळून येत आहेत. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आज मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) झोपडपट्टीत 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

धारावीत आज 13 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या 2245 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत धारावीत 81 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा -वारकऱ्यांनी आषाढीवारीकरिता पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी यांनी बनविलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; Watch Video)

दरम्यान, मुंबईत शनिवारी 1460 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर 41 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 73,747 इतकी झाली आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 4282 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या शहरातील 27,134 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुंबईतील धारावी झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत होता. परंतु, मागील काही दिवसांपासून धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झालेला पाहायला मिळत आहे. धारावीत दाट लोकवस्ती असल्याने तेथे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे.