Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,105 रुग्णांची नोंद; सध्या शहरात कोरोनाच्या 21,412 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु 
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये आज 1,105 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद व 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 1,16,451 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 393 कोरोन विषाणू बाधित रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 88,299 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये आज 809 कोरोना विषाणू संशयित रुग्णांची भर्ती करण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये 21,412 कोरोनाच्या सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजच्या 49 मृत्युंसह मुंबईमधील एकूण मृत्यूंची संख्या 6444 वर पोहोचली आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 31 रुग्ण पुरुष व 18 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 31 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 76 टक्के झाला आहे. 26 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर फक्त 0.90 टक्के राहिला आहे. 1 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 5,46,620 आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 78 दिवस झाला आहे.

एएनआय ट्वीट -

सध्या मुंबईमधील सुविधा केंद्रांमध्ये एकूण खाटांची क्षमता 16,308 इतकी आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 1 ऑगस्ट नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 617 आहे व सक्रिय सीलबंद इमारती या 5519 इतक्या आहेत. (हेही वाचा: मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे आणखी 13 रुग्ण आढळल्याने आकडा 2573 वर पोहचला, BMC ची माहिती)

दरम्यान, महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्रात आज 9,509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 260 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4,41,228 वर पोहचली आहे.