Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,059 रुग्णांची व 45 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,15,346 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 832 रुग्ण बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत 87,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईमध्ये आज 910 कोरोनाच्या संशयित रुग्णांची भरती झाली आहे. शहरात सध्या 20,749 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 6,395 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या 37 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 25 रुग्ण पुरुष व 20 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 33 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 76 टक्के आहे. 25 जुलै ते 31 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.91 टक्के आहे. 31 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 5,37,536 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 77 दिवस झाला आहे. (हेही वाचा: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 69 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 192 वर पोहोचली)

एएनआय ट्वीट -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 31 जुलै नुसार मुंबईमधील सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 614 इतकी आहे. सक्रिय सीलबंद इमारती 5409 आहेत. महत्वाचे म्हणजे मुंबईच्या धरावी परिसरात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला चांगलेच यश आले आहे. धारवीत आज कोरोनाच्या 4 रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीमध्ये अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची एकूण संख्या 72 आहे. तर आतापर्यंत धारावी भागातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 2560 पर्यंत पोहचला आहे.