औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 69 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 192 वर पोहोचली
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज सकाळी 69 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 192 वर पोहोचली आहे. यातील 10 हजार 192 रुग्ण बरे झाले असून 475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 3 हजार 525 जणांवर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.

आज सकाळी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मनपा भागातील 43 तर ग्रामीण भागातील 26 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. विशेषत: शहरी भागात कोरोना विषाणूचा संसर्ग जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: भारतात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आढळले 57,117 नवे रुग्ण तर 765 कोरोना बाधितांचा मृत्यू)

दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रात 10 हजार 320 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 22 हजार 118 वर पोहचली आहे. भारतात मागील 24 तासात 57,117 नवे रुग्ण आढळले असून 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 36,511 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात 5,65,103 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.