महाविकास आघाडी पक्ष प्रमुख । Photo Credits: PTI

100  Days of Maha Vikas Aghadi:  महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi)  सरकार आज (6 मार्च)  100 दिवसांचा टप्पा पूर्ण करत आहे. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या महिन्याभराच्या राजकीय पेचप्रसंगातून मार्ग काढताना शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाने एकत्र सरकार स्थापन केलं आहे. या सरकारचं नेतृत्त्व शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray)  आहे. मागील 100 दिवसांच्या टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीमधील काही मतभेद जसे जनतेसमोर आले तसेच काही लोकप्रिय घोषणांचीदेखील राज्यभर चर्चा आहे. शिवभोजन थाळीपासून शेतकर्‍यांची कर्जामाफी पर्यंत अनेक घोषणांचा पाऊस मागील काही दिवसांपासून पडत आहे. मग पहा त्यापैकी पहा काही महत्त्वाच्या घोषणा.  महाराष्ट्रात मुस्लीम आरक्षण ते CAA, महाविकास आघाडीच्या 100 दिवसांच्या पहिल्या टप्प्यांत या '4' वेळेस लागली शिवसेना, कॉंग्रेस, NCP पक्षातील मैत्रीची कसोटी

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना -:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना निकष,अटी, पात्रता यांबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

शिवभोजन थाळी :

26 जानेवारी 2020 दिवशी यंदा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनतेला 10 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार या योजनेला शिवभोजन थाळी असं नाव देण्यात आलं आहे. तुमच्या जिल्ह्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी?

मुंबई 24 x7

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारी पासूनच मुंबई 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शॉपिंग सेंटर, उपहारगृहं, सिनेमागृह 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गिरणी कामगारांना घर

मुंबई महापालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमुळे रोजगार गमावलेल्या कामगारांना सोडतीच्या माध्यामातून घरं देण्यात आली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या सोडतीमध्ये 17 हजार भाग्यवान विजेत्यांना आपली मुंबईमध्ये हक्काच्या ठिकाणी घरं मिळाली. MHADA Mill Worker Lottery Results 2020: गिरणी कामगारांच्या 3894 घरांची सोडत जाहीर; mhada.gov.in वर पाहा संपुर्ण निकाल, वाचा सविस्तर

महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी (28 नोव्हेंबर) दिवशी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या सहा मंत्र्यांचादेखील शपथविधी पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर कॅबिनेटचा विस्तार करण्यात आला. सध्या शिवसेना, कॉंग्रेस, एनसीपी एकत्रितपणे सरकारचा गाडा हाकत आहे. भविष्यात विविध टप्प्यातून जाणारे हे सरकार नेमके काय काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.