Shiv Bhojan Thali | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Shiv Bhojan Thali in Your District: शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) योजना प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 26 जानेवारी या दिवशी मोठ्या धुमधडाक्यात सुरु करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अनुक्रमे पुणे, मुंबई आणि नाशिक येथे आणि इतर जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्याच्या पालकंत्र्यांनी या योजनेचा शुभारंभ केला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनतेला 10 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध झाले आहे. सध्या बहुचर्चेत असलेली ही शिवभोजन थाळी तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी मिळणार घ्या जाणून.

तुमच्या जिल्ह्यात कुठे मिळणार शिवभोजन थाळी?

शिवभोजन थाळी मिळण्याचे ठिकाण जिल्हा आणि ठिकाण

क्र जिल्हा ठिकाण क्र  जिल्हा  ठिकाण
1 पुणे · महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा

·  कौटुंबिक न्यायालय

· कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह

·  स्वारगेट एसटी स्थानक

·  गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११

· महात्मा फुले मंडई

· हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय

9 सांगली

 

· बस स्थानक

· शासकीय रूग्णालय

· कृषी उत्पन्न बाजार समिती

2 पिंपरी चिंचवड

 

·  महापालिकेचे उपाहारगृह

· यशवंतराव चव्हाण रुग्णालय

· वल्लभनगर बसस्थानक

· नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळेल

10 हिंगोली

 

·  जिल्हा सामान्य रूग्णालय
3 नाशिक

 

·    कृषी उत्पन्न बाजार समिती

· जिल्हाधिकारी कार्यालय

·   नाशिकरोड रेल्वेस्टेशन

 

11 चंद्रपूर

 

·   बस स्टँड परिसर

·  गंज वॉर्ड भाजीपाला बाजार

·         जिल्हा सामान्य रूग्णालय

 

सिंधुदुर्ग

 

· जयभवानी हॉटेल

· जिल्हा मुख्यालय परिसरातील उपहारगृह

 

12 वाशिम

 

· कृषी उत्पन्न बाजार समिती

· जिल्हा सामान्य रुग्णालय

 

4 सोलापूर

 

· मार्केट यार्ड

· मार्कंडये रूग्णालय

· अश्विनी रूग्णालय

 

13 वर्धा

 

· जिल्हा सामान्य रूग्णालय

· सत्कार भोजनालय

 

5 परभणी

 

· जिल्हा सामान्य रूग्णालय

· बस स्थानक नवा मोंढा

 

14 भंडारा

 

· जिल्हा परिषदेत आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटाचे भोजनालय

· महसूल कॅटीन

 

6 नागपूर

 

· डागा हॉस्पिटल

·  गणेशपेठ बसस्थानक

· राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल

· कळमना मार्केट

· मातृसेवा संघाजवळ, महाल

15 कोल्हापूर

 

· सावित्रीबाई फुले हॉस्पिटल रोड वरती रुद्राक्षी स्वयम् महिला बचत गट

·         जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज

· ताराबाई रोडवरील महालक्ष्मी भक्तमंडळ

· साईक्स एक्स्टेंशनजवळील हॉटेल साईराज

7 अहमदनगर

 

·  रेल्वे स्टेशनसमोरील दत्त हॉटेल

· माळीवाडा बसस्थान परिसरातील हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र

· तारकपूर बसस्थानकासमोर हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र

· जिल्हा रूग्णालयाजळील कृष्णा भोजनालय

· मार्केट यार्ड परिसरातील हॉटेल आवळा पॅलेश

 

16 बुलढाणा · बसस्थानक

· जिजामाता प्रेक्षागार

· कृषी उत्पन्न बाजार समिती

8 रत्नागिरी

 

· जिल्हा शासकिय रूग्णालय

· हॉटेल मंगला

· बस स्थानक

· रेल्वे स्थानक

(हेही वाचा, खुशखबर! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु होणार 'शिवभोजन' थाळी; 10 रुपयांमध्ये मिळणार सकस आहार, जाणून घ्या स्वरूप)

कशी असेल शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना (राज्यातील गरीब, गरजू जनतेला) केवळ 10 रुपयांत भोजन मिळणार आहे. या थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, भात, एक वाटी वरण असे पदार्थ असणार आहेत. विविध स्वयंसेवी संस्था, भोजनालयं यांच्याकडे ही थाळी 50 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. परंतू, लाभार्थ्यांना मात्र ही थाळी केवळ 10 रुपयांत उपलब्ध होणार आहे. उर्वरीत 40 रुपये हे राज्य सरकार संबंधीत भोजनालय आणि स्वयंसेवी संस्थांना म्हणजेच ही थाळी देणाऱ्या संस्थांना देणार आहे.ग्रामीण भागात ही थाळ 35 रुपयांमध्ये मिळणार आहे. परंतू इथेही लभार्थ्यांना ही थाळी 10 रुपयांमध्येच दिली जाणार असून, उर्वरीत रक्कम राज्य सरकार संबंधीत भोजनालयं आणि स्वयंसेवी संस्थांना देणार आहे.