कांदा कापताना डोळ्यांमधून पाणी येते? उपायासाठी 'या' सोप्प्या ट्रिक वापरा
Onion Cutting (Photo Credits-Facebook)

लज्जतदार आणि चमचमीत खाण्याची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये विविध मसाल्यांसह काही गोष्टींचा वापर केला जातो. पण कांद्याचा खासकरुन वापर केला गेल्यास त्याला उत्तम चव येते. ऐवढेच नव्हे तर काही जणांना कच्चा कांदा खाण्याची सुद्धा सवय असते. पण कांदा कापणे अगदी सोपे असले तरीही तो कापताना डोळ्यांतून पाणी येते. असे का होते तुम्हाला माहिती आहे का? यावर नेमका काय उपाय करावा याबद्दलच आम्ही तुम्हाला अधिक सांगणार आहोत.(Health Tips : रात्री जेवल्यानंतर लगेचच 'ही' फळे चुकूनही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतात दुष्परिणाम)

कांदे कापताना डोळ्यांतून पाणी येणे साहजिकच आहे. कारण कांद्यामधून निघणाऱ्या अमीने अॅसिडीमुळे आपले डोळे झोंबण्यासह त्यामधून पाणी येण्यास सुरुवात होते. कारण या अॅसिडचा थेट संबंध डोळ्यासोबत आल्यास असे होते. मात्र तुम्ही घाबरु नका. पुढील काही सोप्प्या ट्रिक वापरुन तुम्ही कांद्यामुळे डोळ्यात येणारे पाणी थांबवू शकता.

- कांदा कापण्यापूर्वी त्याची साली काढून झाल्यानंतर तो जवळजवळ अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर जर तुम्ही कांदा कापण्यासाठी घेतल्यास डोळ्यातून पाणी अजिबात येणार नाही. पण पाण्यातून कांदे काढल्यानंतर ते कापताना काळजी घ्या. कारण ते थोडे बुळबुळीत होतात अन्यथा कापताना तुमच्या हाताला इजा होण्याची शक्यता असते.

-कांदा सोलल्यानंतर तो विनेगर (Vinegar) आणि पाणी एकत्रित करुन त्यात बुडवून ठेवा. असे केल्याने सुद्धा डोळ्यातून पाणी येणार नाही.(Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी प्या तुळस आणि ओव्याचे पाणी; असे होतील फायदे)

-तसेच कांदा कापल्यानंतर डोळे चुरचुरण्यास सुरुवात होते. पण यावर अगदी सोप्पा उपाय म्हणजे त्याच्या साली काढल्यानंतर तो तुम्ही थोडावेळासाठी फ्रिजमध्ये ठेऊ शकता. लक्षात ठेवा कांदा एका डब्यात भरुन ठेवा. अन्यथा सर्वत्र त्याच्या फ्रिजमध्ये वास पसरु शकतो.

दरम्यान, कांदा कापण्याची वेगवेगळी पद्धत आहे. पण नेहमीच लक्षात ठेवा की, कांदा कापताना जर डोळ्यातून पाणी येत असेल त्यावेळी थोडावेळ थांबा. त्यानंतरच पु्न्हा एकदा कांदा कापण्यास सुरुवात करा. यापेक्षा वेगळी पद्धत म्हणजे कांदा धुवून घ्या आणि नंतर तु्म्हाला हव्या असलेल्या आकारात तुम्ही कापू शकता.