Health Tips : रात्री जेवल्यानंतर लगेचच 'ही' फळे चुकूनही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतात दुष्परिणाम
ही काही ठराविक फळंतुम्ही रात्री जेवल्यानंतर खाल्ली तर ती फायदा कमी आणि हानीच जास्त करतात.खाद्य तज्ञ सांगतात की फळ खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा असेच म्हटले आहे.
बर्याचदा लोकांना जेवणानंतर फळे खायला आवडतात. ऑफिस असो वा घर जेवणानंतर फळं खाणे सामान्य गोष्ट आहे. परंतु आपल्याला माहिती आहे का की अशी पुष्कळ फळे आहेत जी रात्री जेवल्यानंतर खाऊ नयेत. जर ही काही ठराविक फळं तुम्ही रात्री जेवल्यानंतर खाल्ली तर ती फायदा कमी आणि हानीच जास्त करतात.खाद्य तज्ञ सांगतात की फळ खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा असेच म्हटले आहे. रिकाम्या पोटी आंबट फळांशिवाय इतर फळे खाणे चांगले असते. जिथे जेवणा नंतर फळं खाण्याचा प्रश्न आहे, त्याला आयुर्वेद योग्य मानत नाही. आयुर्वेदानुसार त्याचा संपूर्ण पाचन तंत्रावर परिणाम होतो. तथापि, आधुनिक विज्ञान जेवणानंतर फळे खाण्यावर काही बोलत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत अशी कोणती फळे आहेत जी रात्रीच्या जेवणानंतर खाणे टाळावे. (Health Benefits Of Dry fruits: चांगल्या आरोग्यासाठी 'हे' ड्रायफ्रुइट्स आहेत सर्वात प्रभावी; जाणून घ्या फायदे)
रात्री जेवल्यानंतर कोणती फळे खाऊ नयेत
- आंबा खाऊ नये. यात साखर भरपूर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी हे अजिबात सेवन करू नये. ते गरम असते. म्हणूनच, जेवणाच्या एक तासापूर्वी खाण्याचा सल्ला दिला जातो.
- टरबूज खाण्याची योग्य वेळ दुपारी आहे.रात्रीच्या जेवणानंतर ते सेवन करू नये.
- द्राक्षे शरीरात ओलावा टिकवून ठेवतात. द्राक्षे खाण्याच्या आणि जेवणाच्या वेळेच्या दरम्यान फरक असणे फार महत्वाचे आहे.
- केळी शरीरात उष्मांक आणि ग्लुकोजची पातळी वाढवते. म्हणून रात्रीच्या जेवणानंतर ते लगेच खाऊ नये.
- मोसंबीमध्ये ग्लूकोज असते, ज्यामुळे ऊर्जा मिळते. दुपारी त्याचे सेवन केले पाहिजे. ते डिहायड्रेशनच्या समस्येपासून मुक्त करते त्यामुळे उन्हात बाहेर पडण्यापूर्वी त्याचे सेवन करावे.
- जेवणाच्या 1 तासापूर्वी किंवा जेवणानंतर 1 तासाने व्हिटॅमिन-सी समृद्ध संत्राचे सेवन करावे.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2021 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

