Western vs Indian Toilet : जाणून घ्या आपल्या स्वास्थ्यासाठी कोणते आहे फायदेशीर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit:फाइल फोटो )

Western vs Indian Toilet : इंडियन टॉयलेट चांगले की, वेस्टर्न टॉयलेट या वाद तर नेहमीच उद्भवत असतो. कित्येक वर्षांपासून आपण भारतीय टॉयलेटचा वापर करत आलो आहोत, मात्र जेव्हा वेस्टर्न टॉयलेट ही संकल्पना समजली तेव्हा जास्त त्रास अथवा कटकट नको म्हणून भारतीयदेखील वेस्टर्न टॉयलेटला प्राधान्य देऊ लागले. मात्र मूळ मुद्दा तिथेच राहतो की तुमच्या स्वास्थ्यासाठी दोहोंपैकी कोणते टॉयलेट फायदेशीर आहे. सर्व गोष्टींचा विचार केला, याबाबतीत झालेला रिसर्च पाहिला तर वेस्टर्नपेक्षा भारतीय टॉयलेट हे फायदेशीर असल्याचे आढळले आहे. कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपण आपल्या जीवनात पाश्चिमात्य लाइफस्टाइलचा अवलंब करीत आहोत, तुम्हीही हे करत असला तर हा लेख नक्की वाचा

भारतीय टॉयलेट चांगले की वेस्टर्न टॉयलेट

> भारतीय टॉयलेट तुमच्या शरीराच्या व्यायामासाठी चांगले आहे. बसताना तुमचा पूर्ण ताण तुमच्या पायांवर असतो. त्यामुळे पायांचे स्नायू ताणले जातात. तसेच तुमच्या तळपायांचाही व्यायाम होतो. अशा प्रकारे बसल्याने तुमचे रक्ताभिसरणही योग्य प्रकारे होते. याउलट वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसल्यासारखे बसता. त्यामुळे शरीराला कोणताही व्यायाम मिळत नाही.

> गरोदर महिलांनी इंडियन टॉयलेटचा वापर केल्याने त्यांच्या गर्भाशयावर ताण पडत नाही, यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची संभावना अधिक असते.

> शारीरिक स्वच्छतेसाठीही भारतीय टॉयलेट चांगले आहे. वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुमचे शरीर कमोडच्या सानिध्यात येते. त्यामुळे युरीन इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.

> वेस्टर्न टॉयलेटचा वापर करणारे लोक स्वच्छतेसाठी टॉयलेट पेपरचा वापर करतात. तर भारतीय शौचालयात पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे स्वच्छता अधिक चांगली केली जाते.

> भारतीय टॉयलेटपेक्षा वेस्टर्न टॉयलेटमध्ये पाण्याचा अपव्यय अधिक होतो. कमीत कमी 2-3 वेळा फ्लश करावे लागते त्यासाठी भारतीय टॉयलेटपेक्षा जास्त पाणी लागते.

> भारतीय शौचालयाचा वापर करुन आपली पचनक्रिया चांगली होते. असे बसल्याने पोटावरील दाब योग्य पद्धतीने वाढतो आणि त्यामुळे योग्यप्रकारे तुम्ही शौच करु शकता.

> पर्यावरणाचा विचार करताही भारतीय टॉयलेटचा चांगले आहे. वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुम्हाला पेपरचा वापर करावा लागतो यामुळे भरपूर प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याऐवजी भारतीय टॉयलेटमध्ये ण्याचा वापर होतो.