
हैसेला मोल नसतं आणि वयही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे प्रत्येकाची हौस वेगळी. मायकेल आणि त्याची पत्नी डेबी या वृद्ध जोडप्यालाही अशीच हौस होती. या हौसेखातर ते जगभ्रमंतीवर निघाले. या जोडप्याने 5 वर्षांच्या कालावधीत तब्बल एकदोन नव्हे तर 80 देश फिरले. 80 देशांतील तब्बल 250 शहरांना भेटी दिल्या. या जाडोप्यातील आजोबांचे वय आहे फक्त 72 वर्षे. तर आजीचे केवळ 62 वर्षे. होय, या दाम्पत्याने जगभ्रमंतीसाठी केवळ एक,दोन आठवडे किंवा एक-दोन महिन्यांचे प्लॅनिंग केले नाही. तर, त्यांनी काही वर्षांचे प्लॅनिंग केले. हे जोडपे अमेरिकेतील सिएटल येथे राहणारी आहे. हे जेष्ठ दाम्पत्य ‘Senior Nomads’ नावाच एक ब्लॉगही चालवते.
या जोडप्याने आपली जगभ्रमंती 2013मध्ये सुरु केली. आता तुम्ही म्हणाल त्यांनी या भ्रमंतीसाठी इतका पैसा आणला कोठून? प्रश्न रास्त आहे. पण, या पश्नावर दाम्पत्यानेच उत्तर दिले आहे. जगभ्रमंतीसाठी त्यांनी घरदार विकले. जवळचे भागभांडवल, जमीन जुमला, बँकेतले सेव्हींग्ज अशा सर्व गोष्टी मोडीत काढल्या आणि पैसे जमा केले. या दाम्पत्याला स्वत:च्या घरात राहण्याऐवजी लोकांच्या घरात भाडे देऊन राहायला आवडते. ते जेथे जातात तेथे स्वत:चेच घर समजून राहतात. हे लोक हॉटेलऐवजी लोकांकडे भाड्याने राहतात. एअरबीएनबीच्या माध्यमातून हे लोक घरं बूक करतात. (हेही वाचा, आता व्हिसाशिवाय फिरू शकता हे सुंदर देश)
आपल्या माहितीसाठी असे की, हे जेष्ठ दाम्पत्य ‘Senior Nomads’ नावाच एक ब्लॉगही चालवतात. हे दाम्पत्य सांगते की, ते लोक प्रवासासाठी एका रात्री 6300 रुपये खर्च करतात. डेबीने एकदा म्हटले होते की, अशा प्रकारे प्रवास करण्याची कल्पना तिच्या मुलीने तिच्या डोक्यात घातली होती. त्यावेळी या दाम्पत्याला भीती होती की, ते पूर्णवेळ ट्रॅव्हल अफोर्ड करतील की नाीह. पण, त्यांची मुलगी प्रवास पूर्ण झाल्यावर त्यांना तिच्याकडे ठेऊन घ्यायला तयार झाली आणि मग त्यांनी हे धाडसी पाऊल उचले. जगप्रवास केल्यावर आलेल्या अनुभवाबद्धल दोघेही फार आनंदी आहेत.