फिरणे कोणाला आवडत नाही? फिरायला न आवडणारी लोकं फार कमीच असतील. आजकाल तर मुली सोलो ट्रिपलाही जाऊ लागल्या आहेत. पण मुलींना एकटे फिरायला पाठवताना घरातील मंडळींनाही काळजी वाटते. तसंच मुलींनाही त्यांची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. सोलो ट्रिप प्लॅन करताय ? मग या '5' गोष्टी जरुर लक्षात ठेवा !
भारतातील ही काही पर्यटनस्थळे जिथे मुली पर्यटनाचा बिनधास्त अनुभव घेऊ शकतात. मुलींना सोलो ट्रिपसाठी सुरक्षित अशी काही पर्यटनस्थळे....
वाराणसी
वाराणसी हे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. काशी विश्वनाथच्या नगरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी देशातून नाही तर जगभरातून अनेक पर्यटक येतात. वाराणसीचे वेगवेगळे घाट पाहण्याची मज्जाच खूप खास आहे. फिरणे हा तुमचा छंद असेल किंवा नवनव्या जागा एक्सप्लोर करायला तुम्हाला आवडत असतील तर वाराणसी हा चांगला पर्याय आहे. सोलो ट्रिप गर्ल्ससाठी ही जागा अतिशय सुरक्षित आहे.
आग्रा
ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. ताजमहाल पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होते. आग्र्याला ताजमहलाशिवाय इतर अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत. ही स्थळं पाहण्याची इच्छा असल्यास आग्र्याला तुम्ही पसंती देऊ शकता. मुलींना तिथे जाणे सोपे आणि सुरक्षित आहे.
चंबा
हिमाचल प्रदेश हे पर्यटकांचे खास आकर्षण. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते. हिमाचल प्रदेशातील चंबा हे असेच निसर्गसौंदर्याने नटलेले शहर. मोठमोठे पहाड, निसर्गाची किमया पाहण्यासाठी तुम्ही या स्थळाला नक्की भेट देऊ शकता. तसंच मुलींसाठी देखील हे शहर सुरक्षित आहे.
चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नईत अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. मुलींसाठी अतिशय सुरक्षित असे हे पर्यटनस्थळ आहे. फिरण्याची आवड असलेल्या मुलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
म्हैसूर
म्हैसूरच्या अनेक गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत. गर्दी गोंधळापासून दूर जात शांततेत आणि एकांतात वेळ घालवायचा असल्यास ही जागा अतिशय योग्य आहे. तुम्ही वीकेंड प्लॅन करुन म्हैसूर, बंगळुरू या स्थळांना भेट देऊ शकता.
भारतातील ही प्रसिद्ध पर्यटनस्थळं असून सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तुम्ही या स्थळांची निवड करु शकता. त्याचबरोबर ही स्थळं मुलींसाठी अतिशय सेफ आहेत.