Camping near Mumbai (Photo Credits: Pixabay)

Camping Spots Near Mumbai For 31st Celebration: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन कसं आणि कुठे जाऊन करावं? असे प्रश्न हमखास प्रत्येकाला पडतात. कारण कुठेही जायचं म्हंटलं की तिथले हॉटेल्स मात्र आधीच फुल झालेले असतात. मग अशा वेळेस काय करायचं? यावर एक उत्तम पर्याय म्हणजे आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना घेऊन कॅम्पिंगला जाणं. गर्दीपासून दूर आणि मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असे अनेक कॅम्पिंग स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही या 31 डिसेंबरला धमाल करायला जाऊ शकता. नाच, गाणी आणि खेळ यांचा मेळ घालत तुम्ही नवं वर्षा अगदी उत्साहात साजरा करू शकता. पाहा मुंबईजवळ असणारे हे 5 बेस्ट कॅम्पिंग स्पॉट्स...

भंडारदरा

मुंबईहून लोकल पकडून तुम्ही कसारा गाठू शकता. कसाऱ्यावरून तुम्हाला अनेक गाड्या भंडारदराच्या दिशेने जायला मिळतात. अगदी स्टेशनच्या बाहेर उभे असलेल्या ट्रॅक्स तुम्हाला भंडारदरा घेऊन जातात. भंडारदरा मध्ये अनेक कॅम्पिंग स्पॉट्स आहेत, अगदी लेक साईड कॅम्पिंगचा अनुभव देखील तुम्हाला इथे घेता येतो. भंडारदरा गावातील अनेक जण कॅम्पिंगचा व्यवसाय करतात त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनही टेन्ट बुक करू शकता.

पावना

लोणावळ्याहून अगदी जवळ असणारी एक सुंदर कॅम्पसाईट म्हणजे पावना. पावना धरणाला अगदी लागून विविध कॅम्प साईट्स इथे पाहायला मिळतात. लोणावळा किंवा कामशेत या दोन्ही रेल्वे स्थानकांवरून पावनाकडे जायला तुम्ही जीप किंवा ट्रॅक्स बुक करू शकता. इथेही भंडारदरा सारखे अनेक गावकरी कॅम्पिंगचा व्यवसाय करत असल्याने तुम्ही तिथे जाऊनही तुमचे टेन्ट्स बुक करू शकता.

कोलाड

मुंबईहून 3 ते 4 तासांच्या अंतरावर असणाऱ्या कोलाड येथे कुंडलिका नदी आहे. या नदीत रिव्हर राफ्टिंग केले जाते व नदीच्या काठी अनेक ठिकाणी कॅम्पिंगचे उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे कोलाडला रिव्हर राफ्टिंगसोबत कॅम्पिंग असे दोन्ही पर्याय अनुभवायला मिळतात.

प्रबळमाची

कोणाला जर ट्रेकिंग आणि कॅम्पिंग अशा दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या असतील तर प्रबळमाची हा उत्तम पर्याय ठरतो. पनवेलहून तासाभराच्या अंतरावर ठाकूरवाडी हे गाव आहे. तिथून तासाभराचा ट्रेक करत तुम्ही प्रबळमाचीवर पोहोचू शकता. या माचीवर एका गावकऱ्याचं घर आहे, जे तुम्हाला कॅम्पिंग आणि जेवणाची सोया करून देऊ शकतात.

Pre-Wedding Shoot Spots In Mumbai: प्री वेडिंग फोटो शूट करणार आहात? मुंबईतील 'या' पाच ठिकाणांचा पर्याय ठरेल अगदी बेस्ट

वांगणी

बदलापूर जवळील वांगणी येथे अनेक ठिकाणी नदीच्या काठावर कॅम्पिंग केले जाते. वांगणी गावात अनेक गावकरी कॅम्पिंगचा व्यवसाय चालवतात त्यामुळे तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय इथे मिळू शकते.