Monsoon Tips for Bike Riders: पावसाळ्यात बाईक चालवताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
BIke (Photo Credits: PTI)

पाऊस पडायला सुरुवात झाली की रस्ते ओले होतात. अशा वेळी निसरड्या रस्त्यांवर बाईक्स (Bike) स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात बाईकवरुन लॉँग राइडला जाण्यात एक वेगळीच मजा असते. किंबहुना अनेकांना असे करणे फार आवडते. मात्र पावसाळ्यात असा अनुभव घ्यायचा असेल तर काही काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा ही मजा तुमच्या जीवावर बेतू शकते. पावसात बाईकवरून प्रवास करताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे अथवा काही गोष्टींची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.

यंदा लॉकडाऊनमुळे तुम्हाला विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. मात्र कामानिमित्त बाहेर पडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

1. हेल्मेट

पावसात रस्ते ओले होताता अशा वेळी बाईक स्लिप होण्याची शक्यता असते. यामुळे नेहमी हेल्मेट वापरा.

2. हेल्मेट फिंगर वायपर

पावसात पाण्याच्या थेंबामुळे हेल्मेटवर पाण्याचे थेंब दिसतात. त्यामुळे समोरचा रस्ता अस्पष्ट दिसतो. अशा वेळी बाजारात मिळणारे फिंगर वायपर वापरू शकता.

3. समोरच्या गाडीला फॉलो करा.

पावसात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ता दिसत नाही अशा वेळी जर तुमच्या पुढे कोणती गाडी असल्यास त्या गाडीपाठोपाठ सावकाश आपली बाईक चालवा. पावसात बाईक रायडिंगचा प्लान करताय ? मग चुकूनही विसरु नका या गोष्टी

4. स्लिपरी रस्त्यावर बाईक सरळ चालवा

स्लिपरी रस्त्यावर बाईक वेडीवाकडी वळणं न घेता सरळ दिशेने चालवा. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते.

5. बाईकच्या लाईट्स तपासा

बाईकच्या लाईट्स नीट तपासून पाहा आणि प्रवासादरम्यान त्या सतत चालू ठेवा.

पावसात राइडला जाणे, लाँग ड्राईव्ह करणे अशी अनेकांना इच्छा असते. मात्र अशा वेळी योग्य ती काळजी घेणे गरजे आहे. अन्यथा तुमच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.