पावसाळा सुरु झाला की सर्वात जास्त ज्या गोष्टीला उधाण येते ते म्हणजे बाईक रायडिंगला. बरेच बाईक रायडर्स (Bike Riders) बाईक रायडिंगचे (Bike Riding) प्लान्स बनवतात. कारण पावसाळ्यात थंडगार, हिरव्यागार वातावरणात बाईक रायडिंगची मजाच काही और असते. बाईक वर स्वार होऊन निसर्गाचा तो आल्हाददायक अनुभव घेण्याची बातच काही और आहे. मात्र पावसाळ्यात रस्ते ओले झाल्याने ते खूप निसरडे होतात. अशा वेळी बाईक स्लिप होणे किंवा अपघात होण्याची शक्यता असते. अशा वेळी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते.
बाईकवर स्वार होऊन पावसात भिजण्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि आपली राइड खूप मजेशीर आणि सुखकर बनवायची असेल तर पुढील 4 गोष्टींचा नक्की विचार करा.
1. विशेष हेल्मेट
पावसात आपल्या मित्रांसोबत बाईक रायडिंगला जात असताना आपल्या हेल्मेटमध्ये काही बदल केले पाहिजे. त्यात मुख्य बदल म्हणजे तुमचे हेल्मेट अँटी-फॉग कोटिंग चे करुन घ्या. असे केल्यास पावसात बाईक चालवताना तुमच्या हेल्मेटच्या काचेवर धुकं जमा होणार नाही.
2. वॉटरप्रूफ गियर
बाईक सतत पाण्यात भिजल्यामुळे ब-याचदा तिच्या गियर मध्ये काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या बाईकमध्ये स्पेशल वॉटरप्रूफ गियर लावण्याची व्यवस्था करावी.
3. स्मूथ टायर्स
पावसाळ्यात निसरड्या रस्त्यांमुळे बाईक घसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाईक राइड करताना आपल्यासोबत काही दुर्घटना घडू नये यासाठी बाईक राइडवर निघण्याआधी आपल्या बाईकचे टायर एकदा तपासून घ्या. कारण ज्यांच्या बाईकचे टायर बरेच घासले गेलेले असतात, अशा बाईक घसरण्याच्या घटना जास्त होतात. त्यामुळे तुमच्या बाईकचे टायर सुयोग्य स्थितीत आहेत का हे एकदा तपासून घ्या.
4. सेफ्टी आउटफिट
ब-याचदा आपण बाईकर्संना सेफ्टी आउटफिट घालून बाईक चालवताना बघितले असेल. अशा प्रकारचे आउटफिट आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहेत. सेफ्टी आउटफिट घातल्याने बाईक दुर्घटना झाल्यास जास्त इजा होत नाही.
हेही वाचा- Honda CBR650R ची भारतात डिलिव्हरी सुरु; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स
पावसाळ्यात बाईक रायडिंग हा एक सर्वोत्तम असा अनुभव आहे. थोडक्यात पावसाची मजा बाईक रायडिंगने करणे म्हणजे बाईक स्वारांसाठी एक पर्वणीच असते. आयुष्यात सर्व मजा करा मात्र त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या, कारण घरी तुमची कोणतरी वाट बघतय.