होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India) आपल्या नव्या मिडलवेट स्पोर्टबाईक Honda CBR650R ची डिलिव्हरी सुरु केली आहे. भारतात Honda CBR650R या बाईकची किंमत 7.70 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. सध्या उपलब्ध असलेल्या Honda CBR650F बाईकची रिप्सेसमेंट म्हणून Honda CBR650R ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे.
होंडाच्या या स्पोर्ट्स बाईकमध्ये चार सिलेंडर असलेले 649 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन लिक्विड कुलिंगसह उपलब्ध आहे. 649 सीसी चे इंजिन 12,000rpm सह 94bhp पावर जेनरेट करतं. तसंच 64Nm चा पीक टॉर्क देतं.
Honda CBR650R मध्ये रेडिड डाऊन शिफ्टिंगसाठी एक स्लिपर क्लच आणि होंडाची स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दिली आहे. CBR650R बाईकच्या तुलनेत CBR650F या बाईकचे वजन 6 किलोग्रॅम कमी आहे. सस्पेंशनमध्ये 41 mm अपसाइड डाऊन Showa सेपेरेट फंक्शन फॉर्क्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर 310 mm ट्विन फ्रंट डिस्कसह निसिन फोर-पॉट कॅपिलर्स आणि सिंगल 240 mm रियर डिस्कसह स्टॅंडर्ड ड्युअल चॅनल ABS देण्यात आला आहे.