प्रतिकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

पुण्यामध्ये (Pune) बोपदेव घाटात (Bopadev Ghat) दुचाकीस्वाराला (Biker) लुटल्याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील विक्रांत गारगोटे यांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. या घटनेने अलीकडच्या काळात मोटारसायकलवरून आलेल्या सशस्त्र टोळ्यांकडून लूट होण्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या प्रकरचे गुन्हे याआधीही मोठ्या प्रमाणात घडले आहेत.  एफआयआरनुसार, गारगोटे आणि त्याचा मित्र मोटारसायकलवरून घाटातून निघाले असता दुचाकीवर आलेल्या चार अल्पवयीन मुलांनी मोटारसायकलवरून आलेल्या गारगोटे यांना धमकावण्यास सुरुवात केली.

दुचाकीवरून आलेल्या गारगोटे यांच्या मित्राची दोन हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी सांगितले की, आरोपींनी दोघांना चॉपरने धमकावत शारिरीक हल्ला केला. गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देऊन त्यांनी जबरदस्तीने दोघांकडून रोख रक्कम काढून घेतली. हेही वाचा Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका पुतळे, पिण्याच्या पाण्याचे कारंज्यांसाठी 1.9 कोटी रुपये करणार खर्च, मनपा अधिकाऱ्याने दिली माहिती

13 नोव्हेंबर रोजी हडपसर पोलिसांनी टिळकनगर, कोंढवा येथील अक्षय सलगर याला मंतरवाडी-कात्रज बायपासवर ट्रकचालकाला लुटल्याप्रकरणी अटक केली. ट्रक चालक रविराज शिंदे यांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. गेल्या काही काळात अशाच प्रकारच्या घटनांमुळे बोपदेव घाट बदनाम झाला आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात बोपदेव घाट परिसरात तीन मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची 25 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून घेतली होती.

महिला आणि तिचा प्रियकर बोपदेव घाटातून परतत असताना येवलेवाडीच्या दिशेने येणाऱ्या वळणावर या तिघांनी त्यांना अडवले. महिलेला लुटून जखमी केले तर तिच्या प्रियकराकडूनही एक हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले. कोंढवा रहिवासी मंचाने घाटाच्या आत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे आणि प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी परिसरात ड्रोन गस्त घालण्याची विनंती पोलिसांना केली आहे.