Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका पुतळे, पिण्याच्या पाण्याचे कारंज्यांसाठी 1.9 कोटी रुपये करणार खर्च, मनपा अधिकाऱ्याने दिली माहिती
BMC | (File Photo)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पुतळे, पिण्याच्या पाण्याचे कारंजे (Fountain) तसेच इतर कारंजे यांच्या देखभालीसाठी (Care) 1.9 कोटी रुपये खर्च करणार आहे. नागरी संस्थेने एक एजन्सी अंतिम केली आहे जी पुढील तीन वर्षांसाठी या संरचनांची देखभाल करेल. महापालिकेच्या हेरिटेज विभागाने म्हटले आहे की एजन्सी पिण्याच्या पाण्याचे फवारे आणि इतर कारंजे यांची दैनंदिन साफसफाई, देखभाल आणि शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करेल. तसेच काही नुकसान झाल्यास दुरुस्तीची कामे देखील करेल. वर्क ऑर्डर दिल्यानंतर, कंत्राटदार देखभालीचे काम सुरू करेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, शहरात 30 पुतळे असून त्यापैकी अनेक पुतळे पाच ते सहा दशकांपूर्वी उभारण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत 39 कारंजे आहेत. अनेक पिण्याच्या पाण्याचे फवारे 100 वर्षे जुने आहेत. नियमित देखभाल व साफसफाई अभावी या वास्तूंची दुरवस्था झाली आहे. अलीकडेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) महालक्ष्मी रेसकोर्सभोवती सायकल ट्रॅकसाठी होकार दिला. हेही वाचा  Amravati Violence: महाराष्ट्रात सुरु असलेल्या हिंसेचा मागे राज्य सरकार पण भाजप नेत्यांना अटक, राम कदम यांचा सवाल

या प्रकल्पासाठी नागरी संस्था 1.22 कोटी रुपये खर्च करणार असून चार महिन्यांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील वर्षभरात 157 किमी लांबीच्या रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी 1,600 कोटी रुपये खर्च करणार आहे.  महत्त्वाकांक्षी विकास आराखडा 2034 प्रकल्पानुसार, महानगरपालिका परवडणारी घरे, शिक्षण, संपत्ती आणि सामाजिक सुविधा, खुल्या जागा आणि फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) यांना चालना देण्याची योजना आखत आहे. विकास आराखडा 2034 साठी BMC सुमारे 1,600 कोटी रुपये खर्च करेल.