Amravati Violence: महाराष्ट्रात सुरु असलेल्या हिंसेचा मागे राज्य सरकार पण भाजप नेत्यांना अटक, राम कदम यांचा सवाल
BJP MLA Ram Kadam | (Photo Credits: ANI)

Amravati Violence:  महाराष्ट्रातील अमरावतीत बंदच्या हाकेदरम्यान हिंसाचार झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि दगडफेक सुद्धा झाले. आंदोलनकर्त्यांनी पोलीस आणि पत्रकारांवर सुद्धा दगडफेक केली. या सर्व प्रकारामुळे अमरावतीत संचारबंदी आणि इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन आता भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.(Tripura: त्रिपुरातील घटनांबाबत सोशल मीडियावरून पसरवल्या खोट्या बातम्या; कोणत्याही मशिदीचे नुकसान झाले नाही, गृह मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण)

राम कदम यांनी असे म्हटले की, महाराष्ट्राच्या धरतीवर षडयंत्राअंतर्गत जे सांप्रदायिक हिंसाचार झाला यामागे पूर्णपणे राज्य सरकार आहे. पण भाजप नेत्यांना अटक केली आहे. ही कशा प्रकारची विडंबना आहे. यांच्याच शिवसेनेतील नेते जी घटना घडली नाही त्याबद्दल सांगत भडकाऊ भाषण देतात त्यावर कोणताही कारवाई नाही. पुढे असे ही म्हटले की, येत्या निवडणूकीत फायदा व्हावा म्हणून राज्य सरकार आणि काँग्रेसने हे घडवून आणल्याचा आरोप कदम यांनी लावला आहे.(Tripura Violence: महाराष्ट्रात काही भागातील हिंसाचारामुळे पुण्यामध्ये ग्रामीण परिसरात सोशल मीडियावर बंदी घालण्याचे आदेश, पुणे पोलिसांनी जारी केले पत्रक)

Tweet:

दरम्यान, शुक्रवारी अमरावतीमध्ये अनेक मुस्लीम संघटनांनी त्रिपुरा मुद्द्यावरून उग्र रूप धारण केले. याविरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी अमरावती बंदचे आवाहन केले. राजकमल चौकात सर्व हिंदू संघटना आणि भाजप कार्यकर्ते एकत्र आले. यानंतर जमावाने तोडफोड सुरू केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.