Representational Image (Photo Credits: Pexels.com )

ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग कंपनी 'मेक माय ट्रिप'ने (Make My Trip) आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर सादर केली आहे. मेक माय ट्रिपने कॅपिटल प्लॉटसोबत हातमिळवणी केली असून आता तुम्हाला प्रवास खर्चात EMI चा पर्याय देण्यात येणार आहे. कॅपिटल फ्लोट हा एक डिजिटल लिडिंग प्लॅटफॉर्म असून जे युजर्सला पेमेंटचा नवा पर्याय उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे ग्राहक आता हॉटेल बुकींग आणि विमान खर्चात ईएमआयचा पर्याय वापरु शकतात. हा पर्याय परदेशी विमान प्रवासासाठीही तुम्ही वापरु शकता. या सुविधेअंतर्गत ग्राहकांसाठी 2 लाख रुपयांचे क्रेडिट लिमिट ठेवण्यात आलं आहे. पेमेंट ऑप्शनचा विचार करताना युजर्स अगदी सहज पेबॅकचा पर्याय निवडू शकतात. त्यात तुम्हाला 9 महिन्यांचा ईएमआयचा पर्याय मिळेल. भारतीयांना लवकरच मिळणार Chip Based E-Passports, काय असतील या नव्या पासपोर्टची वैशिष्ट्य

पण पेमेंटचा हा नवा पर्याय काही निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 'इन्वाइट ऑनली' या उपक्रमात सहभागी असलेल्या ग्राहकांना हा पर्याय देण्यात येणार आहे. तुम्ही देखील या उपक्रमात सहभागी असला तर या नव्या सुविधेचा लाभ तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला दोन स्टेप्स व्हेरिफिकेशन प्रोसेसमधून जावे लागेल. त्यानंतर तुम्ही अकाऊंट मध्ये क्रेडिट लिमिट सेट करु शकता. मेक माय ट्रिप कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांनी ही सुविधा सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे सुमारे 10 मिलियन ग्राहक या नव्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !

नव्या सुविधेची खासियत

या नव्या सुविधेत तुम्हाला एक्सट्रा पैसे भरावे लागणार नाहीत. ईएमआयमध्येही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. तसंच ही सुविधा तुमच्या क्रेडिट लिमिटवर अवलंबून आहे.