MTDC कडून यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women's Day) निमित्ताने महिला अतिथींसाठी खास सूट जाहीर करण्यात आली आहे. 6-10 मार्च दरम्यान बुकिंग करणार्या महिला ट्रॅव्हलर्स साठी राज्यातील सार्या एमटीडीसी रिसॉर्ट मध्ये 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.
यंदाचा महिला दिन “Gender equality today for a sustainable tomorrow” या थीमवर साजरा केला जाणार आहे. दरवर्षी 8 मार्चला महिला दिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला आणि तरूणींकडून जगात शाश्वत भविष्य निर्मितीसाठी केल्या जाणार्या प्रयत्नांना या निमित्ताने प्रोत्साहन दिले जाणार आहे. टुरिझम वर्कफोर्स डेव्हल्पमेंट मध्ये महिला देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नक्की वाचा: MTDC ने सुरु केली Work From Nature संकल्पना; पर्यटनाचा आनंद घेत करू शकता काम, जाणून घ्या ठिकाणांची नावे व कुठे कराल बुकिंग .
#जागतिकमहिलादिन चे औचित्य साधून @HelloMTDC च्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर केली आहे. यानुसार ६ ते १० मार्च या ५ दिवसांच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या महिला अतिथींसह त्यांच्या परिवारास आरक्षणावर ५० टक्के सूट देण्यात येईल. pic.twitter.com/1BatPM7a9z
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 3, 2022
दरम्यान एमटीडीसी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, www.mtdc.co या त्यांच्या अधिकृट वेबसाईट वर यासाठीचा एक प्रोमो कोड जारी करण्यात आला आहे. त्या अंतर्गत पर्यटक निवास कक्षाच्या आरक्षणासाठी ही 50% सवलत दिली जाणार आहे. पण ही सूट भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवास , एक्स्ट्रा बेड, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, उपहारगृहातील नाश्ता-जेवणासाठी लागू नसेल.
एमटीडीसीचे महाराष्ट्रात 30 पेक्षा अधिक पर्यटक निवास आणि उपहारगृह आहेत. त्यात एक हजाराहून अधिक निवास कक्षांचा समावेश आहे.