IRCTC Rupay SBI Card: कमी दरात बुक करा रेल्वे तिकीट, जाणून घ्या कार्ड फिचरबाबत
Indian Railways (Photo Credits: I File Image)

रेल्वे प्रवास करण्याला प्राधान्य देणाऱ्या मंडळींसाठी काहीशी कामाची बातमी आहे. रेल्वे प्रवासासाठी तुम्ही जर आईआरसीटीसी रुपये एसबीआय कार्ड (IRCTC Rupay SBI Card) द्वारा रेल्वे तिकीट बुकींग केल्या आपल्याला 10% पर्यंत व्हॅल्यूबॅक (Value Back) मिळू शकते. सोबतच रिवर्ड पॉईंट्सही मिळतात. या सेवेसाठी एसबीआय कार्ड (SBI Card) ने आयआरसीटीसी (IRCTC) सोबत भागिदारी जाहीर केली आहे. हे कार्ड सर्व मर्चंड आऊटलेटमध्ये वापरले जाऊ शकते जे लोक रुपये कार्ड (Rupay Card) वापरतात. हे कार्ड 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार आयआरसीटीसीच्या अॅपक किंवा संकेतसस्थळावर (irctc.co.in) AC-1, AC-2, AC-3, AC चेअर कारसाठी तिकीट बुकींग रिवर्ड पॉइंट्स च्या रुपात 10% पर्यंत व्हॅल्यूबॅक मिळतो. याशिवाय आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाईटवर 125 रुपये खर्च केल्यास 1 रिवार्ड पॉइंट मिळतो.

आयआसीटीसी वेबसाई अथवा अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास 1% ट्रॅजेक्शनसाठी चार्ज द्यावा लागत नाही. या कार्डच्या माध्यमातून नॉन फ्यूल ट्रांजेक्शनवर प्रत्येक 125 रुपये खर्च केल्यावर 1 % रिवर्ड पॉईंट मिळतो. वेलकमक ऑफरच्या माध्यमातून 350 बोनस पॉइंट मिळू शकतील. त्यासाठी कार्ड घेतल्यापासून 45 दिवसांच्या आत कमित कमी 500 रुपये इतके सिंग ट्राजेक्शन करावे लागेल. (हेही वाचा, IRCTC आणि FHRAI पर्यटकांना स्वस्तात हॉटेल बुकींग करण्यासाठी करणार मदत ; पहा ही खास ऑफर)

पेट्रोल पंपांवर 500 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत इंधन खरेदी केल्यास 1% इंधन कर द्यावा लागणार नाही. या कार्डच्या माध्यमातून आपण वर्षात 4 वेळा रेल्वे लाऊंज एक्सेस फ्रीमध्ये करु शकता. म्हणजेच आपण प्रत्येक तिमाहितून एक वेळा रेल्वे लाऊंज एक्सेस फ्रीमध्ये करु शकता. हे कार्ड एनएपसी (NFC) टेक्नॉलॉजीयुक्त आहे. यावर टॅप अँड पे सेवाही मिळते.