नव्या वर्षात IRCTC आणले स्वस्त Tour Package; शिर्डी, कोलकाता, गोव्यासह दक्षिण भारताचा समावेश
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आयआरसीटीसी (IRCTC) म्हणजेच भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, दरमहा पर्यटकांसाठी अनेक उत्तम बजेट टूर पॅकेज (Tour Package) आणते. आयआरसीटीसीने नवीन वर्षाचे औचित्य साधत काही स्वस्त पॅकेजेस सादर केले आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डी, कोलकाता, गोव्यासह दक्षिण भारत दौर्‍याचे हे खास पॅकेज आहे. यामध्ये पर्यटक दक्षिण भारतातील अनेक धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकतील. या यात्रेची सुरुवात 3 जानेवारी 2020 पासून होत आहे. जगन्नाथ पुरी ते शिर्डी, शनि शिंगणापूर, महाबलीपुरम, रामेश्वरम ते कन्याकुमारीसह दक्षिण भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश या यात्रेत असणार आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार पॅकेज निवडू रेल्वेसह यात्रेचा आनंद घेऊ शकता.

नववर्ष शिर्डी स्पेशल - 

नवीन वर्षाच्या निमित्ताने आयआरसीटीसीने खास शिर्डीसाठी खास पॅकेज आणले आहे. शिर्डी साई धाम हे असे एक धार्मिक स्थळ आहे, जिथे वर्षभर भाविक येत असतात. आयआरसीटीसीने यासाठी खास पॅकेज आणले आहेत. कर्नाटक एक्स्प्रेस ट्रेन 8 जानेवारी रोजी रात्री 9.15 वाजता नवी दिल्ली रेल्वे जंक्शन येथून सुटेल. या पॅकेजअंतर्गत शिर्डी व्यतिरिक्त शनि शिंगणापूरचे दर्शन येत्रेकारूंना घडवले जाईल. एका व्यक्तीचा खर्च सुमारे 14 हजार रुपये आहे, तर दोन लोकांसाठी तो प्रति व्यक्ती 10,175 रुपये आहे.

अंदमान-कोलकाता - 

आयआरसीटीसीने मार्च मध्ये अंदमान आणि कोलकाता दर्शनासाठी, 1 ते 6 मार्च दरम्यान 6 रात्री आणि 5-रात्री हवाई टूर पॅकेज तयार केले आहे. तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये लखनऊ ते कोलकाता आणि कोलकाता ते पोर्ट ब्लेअर पर्यंत उड्डाणांची व्यवस्था केली जाईल. एकत्र राहणार्‍या दोन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती 50, 200 रुपये आणि 3 जणांसाठी 48,7०० रुपये दर निश्चित केला आहे. (हेही वाचा: Picnic Ideas: मुंबईच्या गजबजाटापासून थोडे दूर असणारे आरामदायी असे '5' आलिशान रिसॉर्ट्स)

गोवा - 

आयआरसीटीसी 25 ते 28 जानेवारी दरम्यान गोवा दौर्‍यासाठी 4 दिवसाचे आणि 3-रात्रीचे हवाई टूर पॅकेज तयार केले आहे. यामध्ये लखनऊ ते गोवा असा विमान प्रवास असेल, तर तिथे एसी बसेसद्वारे गोवा दर्शन घडवले जाईल. टा यात्रेत थ्री-स्टार हॉटेलमध्ये मुक्काम असेल. तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. 2 जणांना प्रत्येकी 26,100 आणि तीन जणांसाठी 24,900 रुपये दर निश्चित केले आहे.

दक्षिण भारत - 

भगवान जगन्नाथ धाम, पुरी ते बिहारमधील गया धाम आणि विशाखापट्टणम अशा ठिकाणी भेट देण्यासाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने आयआरसीटीसीने, 9 रात्री आणि 10 दिवसांचे पॅकेज आणले आहे. हा दौरा 17 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. स्लीपर क्लास अंतर्गत 9,450 रुपये आणि थर्ड एसी क्लाससाठी प्रति व्यक्ती 11,550 रुपये दर निश्चित केला आहे.