Villa Near Mumbai (Photo Credits: Facebook)

थोड्याच दिवसात शाळांना नाताळची सुट्टी पडेल. मुलांना शाळांना सुट्टी पडली की प्लान्स सुरु होतात ते पिकनिकचे. आपल्या कुटूंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले मोठी माणसे आणि शाळेच्या अभ्यासातून काही दिवस सुट्टी मिळालेली बच्चे कंपनी पिकनिक्सचे प्लान्स आखू लागतात. पिकनिक म्हटली प्रत्येकाला एखाद्या शांत, नयनरम्य ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात जावे असे वाटत असते. रोजच्या कटकटीला तसेच घरकामात गुंतलेल्या महिलांसाठी पिकनिक हे छान आराम करण्याचे ठिकाण असते. अशावेळी लोकांना रोजच्या किलकिलाटापासून एखाद्या शांत ठिकाणी जावे असे वाटत असते.

लहान मुले आपल्या सोबत असल्या कारणाने पिकनिकच्या ठिकाणी उत्तमोत्तम राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सोय असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा लोकांसाठी आम्ही मुंबईच्या गजबजाटापासून थोडे दूर असणा-या आरामदायी अशा '5' आलिशान रिसॉर्ट्स (Villa) माहिती देणार आहोत.

1) NB & DB Holidays (Karjat).

कर्जत स्टेशनपासून 13 किलोमीटर दूर भालिवडी गावाजवळ हे आलिशान रिसॉर्ट वसले आहे. 14 नोव्हेंबर 2019 पासून हे रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुले झाले आहे. प्रशस्त स्विमिंग पूल, जनरेटर, चहुबाजूंनी झाडांनी वेढलेले, आलिशान कॉटेजेस शिवाय बंगला देखील या रिसॉर्टमध्ये मिळेल. जेवणाची उत्तम सोय, जाणकार आचारी असल्याने तुमची कुठल्याही प्रकारची गैरसोय येथे होणार नाही. शिवाय एन्जॉय करण्यासाठी उत्तम स्पीकर आणि स्विमिंग पूलमध्ये रेन डान्स आहेतच. कुटूंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे

याविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे  क्लिक करा

2) O2 Villa (Khopoli)

खोपोली स्टेशनपासून साधारण 12 किमी दूर असलेल्या या O2 Villa मध्ये तुम्हाला आरामदायी आणि आलिशान अशा सोयी-सुविधा मिळतील. येथे तुम्हाला खाजगी स्विमिंग पूल, जनरेटर, खाण्या-पिण्याची, राहण्याची उत्तम सोय मिळेल. तसेच डान्सिंगचे दिवाने असलेल्यासाठी येथे खास डिस्को प्रमाणे एक वेगळी रुम बनविण्यात आली आहे. येथील वातावरणही अतिशय शांत आणि आल्हाददायी आहे.

याविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे  क्लिक करा

हेदेखील वाचा- New Year Plans 2020: यंदाचा 31st December साजरा करण्यासाठी हे आहेत मुंबई जवळील 5 हटके कॅम्पिंग स्पॉट्स

3) White Villa (Karjat)

कर्जत मुरबाड मार्गावर असलेल्या  या व्हाईट विलामध्ये प्रशस्त खोल्या, खाजगी स्विमिंग पूल, आल्हाददायक शांत वातावरण मिळेल. मुंबईपासून दूर असलेले पण निसर्गाने वेढलेला हा विला तुम्हाला नक्की आवडेल. येथे तुम्हाला जनरेटर, सर्व प्रकारची विद्युत उपकरणे मिळतील. जेणे करुन तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जेवणासाठी येथे आचारीही असतात.

याविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे  क्लिक करा

4) H2O Villa (Igatpuri)

येथे तुम्हाला 4BHK आणि 5BHK असे 2 प्रकारच्या विलांचे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे तुमच्या माणसांच्या संख्येनुसार तुम्हाला सोयीचा विला तुम्ही निवडू शकतात. अतिशय शांततामय अशा ठिकाणी हा विला असल्यामुळे निसर्गाचा सुंदर अनुभव येथे घेता येईल.

याविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे  क्लिक करा

5) SaffronStays One Tree Farm (Karjat)

आलिशान आणि प्रशस्त असा हा विला आहे. येथे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. किंमतीने जरी महाग वाटत असले तरीही पिकनिकचा प्लान करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.

याविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे  क्लिक करा

कधीतरी आपल्या कुटूंबासोबत पिकनिकसाठी जात असाल तर हात आखडता न घेता पिकनिक साठी जर चांगला पर्याय निवडायचा असेल तर हे रिसॉर्ट खूप चांगले पर्याय आहेत.