World's Most Powerful Passports in 2024: जगात France चा पासपोर्ट सर्वात अव्वल; भारताचा क्रमांक Maldives, Saudi Arabia च्या ही खाली!
Indian Passport | Representational Image

Henley Passport Index for 2024 जाहीर झाला आहे. यामध्ये फ्रान्स (France) देशाने अव्वल स्थान मिळवलं असून भारताच्या पासपोर्टचं रॅन्किंग मागच्या वर्षीच्या तुलनेत एकाने खाली आलं आहे. 84 व्या स्थावरून आता भारत 85 व्या स्थानी आला आहे. भारताच्या पासपोर्ट (Indian Passport) रॅन्किंग मधील ही घसरण आश्चर्यकारक आहे. मागील वर्षी भारतीय पासपोर्ट धारकांना 60 देश व्हिसा फ्री होते यंदा ते 62 झाले आहेत मात्र तरीही भारताच्या पासपोर्टचं रॅन्किंग घसरलं आहे.

The Henley Passport Index कडून देशाचं स्थान हे त्यांच्या पासपोर्टच्या दर्जावरून ठरवते. 2024 मध्ये फ्रान्स अव्वल स्थानी आहे. फ्रेंच पासपोर्ट धारक सध्या 194 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकत आहेत. Germany, Italy, Japan, Singapore, आणि Spain हे देश देखील फ्रांस सोबत टॉप लिस्ट मध्ये आहेत.

पाकिस्तान 106 व्या स्थानी कायम आहे. बांग्लादेश 101 वरून 102 व्या स्थानी आला आहे. तर भारताचे शेजारी मालदिव्ह्स ने मात्र आपलं स्थान 58 व्या स्थानी कायम ठेवलं आहे. मालदिव चा पासपोर्टधारक सध्या 96 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकत आहे.

इराण, मलेशिया, थायलंड कडून भारताला व्हिसा फ्री एंट्री जाहीर झाल्यानंतरही भारताच्या रॅन्किंग मध्ये घसरण बघायला मिळाली आहे. चीनने 2023 मधील 66 वरून या वर्षी 64 व्या क्रमांकावर  झेप घेतली आहे.  कोविड महामारी नंतरच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनने अनेक युरोपीय राष्ट्रांना व्हिसा-मुक्त प्रवेश मंजूर केला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या रॅन्किंग मध्ये दिसत आहे.  आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये देशाची इमिग्रेशन विरोधी भूमिका हा ध्रुवीकरणाचा मुद्दा असल्याचे दिसत असतानाही युनायटेड स्टेट्सचे रँकिंग 7 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर पोहोचले आहे. UPI Service to Sri Lanka and Mauritius: आता मॉरिशस आणि श्रीलंकेतही UPI द्वारे पैसे करता येणार ट्रान्सफर .

The Henley Passport Index गेल्या 19 वर्षांच्या डेटावरून त्याची रँकिंग मिळवते आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) विशेष डेटावर आधारित माहिती ज्यामध्ये जगभरातील 199 भिन्न पासपोर्ट आणि 227 प्रवासाची ठिकाणे समाविष्ट आहेत.