UPI Service to Sri Lanka and Mauritius: आता मॉरिशस आणि श्रीलंकेतही UPI द्वारे पैसे करता येणार ट्रान्सफर
(Photo Credits: AIR/ Twitter)

सोमवार, 12 फेब्रुवारीपासून भारत सरकारकडून श्रीलंका (Sri Lanka) आणि मॉरिशससाठी (Mauritius) UPI सेवा सुरू करण्यात येणार आहे. सोबतच या दोन देशांमध्ये UPI आणि RuPay कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असेल. UPI ग्लोबल बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार आहे.  या दोन देशांतील भारतीय पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. काही दिवसापुर्वीच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरवर देखील UPI सेवा सुरू करण्यात आली होती.

पाहा पोस्ट -

भारतातील रुप कार्डची सेवा आता मॉरिशसमध्येही सुरू होणार आहे.  देशातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. ही UPI सेवा सहयोगी देशांमध्ये नेण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत.  श्रीलंका आणि मॉरिशसशी भारताचे सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत.