'बिकनी एयरलाइन्स' (Bikini Airline) नावाने जगप्रसिद्ध असलेली एअरलाइन्स कंपनी 'Vietjet' (वियतजेट) भारतीय प्रवाशांसाठी एक अनोखी ऑफर घेऊन आली आहे. मूळची व्हिएतनाम (Vietnam ) देशातील असलेली ही कंपनी येत्या डिसेंबर 2019 पासून भारतात आपली सेवा सुरु करत आहे. भारतातून पहिल्यांदाच विमान सेवा देऊ पाहात असलेल्या 'Vietjet' ने प्रवाशांसाठी खास 'गोल्डन डेज ऑफर' (Golden Days Offer) देऊ केली आहे. विशेष म्हणजे या ऑफरमध्ये प्रवाशांना तिकीट दर केवळ 9 रुपये इतका नाममात्र असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जगभरातील सर्वात किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणारी कंपनी 'Vietjet' चा नावलौकीक आहे.
दरम्यान, 6 डिसेंबर 2019 पासून प्रत्येक आठवड्याला सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी चार रिटर्न फ्लाइट्स दिल्ली ते हो-ची-मिन सिटी असा प्रवास करण्यासाठी उड्डाण घेतील. तर, हनोई ते दिल्ली या मार्गावरुन 7 डिसेंबर 2019 पासून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन रिटर्न फ्लाइट्स उड्डाण घेतील.
ऑफर केवळ तीन दिवसांसाठीच
'Vietjet' कंपनीने दिलेली 'गोल्डन डेज ऑफर' केवळ तीन दिवसांसाठीच असणार आहे. लॉन्चिंग कालावधी ध्यानात घेऊन कंपनीने 'सुपर सेविंग टिकट्स' ऑफरही देऊ केली आहे. या ऑफर अंतर्गतच प्रवाशांना केवळ 9 रुपये इतक्या नाममात्र किमतीत तिकीटविक्री केली जाणार आहे. ही ऑफर 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट इतक्या मर्यादित काळासाठीच असणार आहे. आज (21 ऑगस्ट 2019) या ऑफरचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, ग्राहकांना 9 रुपयांत तिकीट मिळत असले तरी, विमान प्रवासात येणार विमानतळ शुल्क, प्रवास कर आणि इतर अधिभार ग्राहकांनाच भरावा लागणार आहे. (हेही वाचा, रशिया ते चीन सुरु होणार जगातील पहिलीच International Cable Car सेवा; दोन्ही देशांतील अंतर होणार काही मिनिटांत पार)
'Vietjet' जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, वियतजेट कंपनीचे उपाध्यक्ष श्री गुयेन थाना सोन यांनी भारतीय हवाई मार्गावरुन विमानसेवा सुरु करत असल्याची घोषणा केली. या वेळी ते म्हणाले, आम्ही भारत आणि वियतनाम अशा दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु करत आहोत. आम्ही आमच्या सेवेचा विस्तार भारतासोबत करत आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.