रशिया ते चीन सुरु होणार जगातील पहिलीच International Cable Car सेवा; दोन्ही देशांतील अंतर होणार काही मिनिटांत पार
Cable Car | Image only representative purpose (Photo credit: Pixabay)

रशिया ते चीन या दोन देशांमधील अंतर आता काही मिनिटांतच पार होणार आहे. तेही आकाश किंवा समुद्र मार्गे नव्हे तर, चक्क कारने. होय, या दोन देशांतील अंतर हे Cable Car सेवेद्वारे पार केले जाणार आहे. दोन देशांमध्ये केबल कार वापरुन अंतर पार करण्याचा International Cable Car सेवेचा हा पहिलाच प्रयोग आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उभय देशांनी 2020 हे वर्ष नक्की केले आहे. या प्रकल्पाच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांसाठी हा अनुभव अधिक सुंदर आणि रोमांचकारी असणार आहे. दोन देशांदरम्यान केबल कारने प्रवास करताना प्रवाशांना अद्भूत दृश्य अनुभवण्यास मिळणार आहे.

ही केबल कार चीनमधील शहर हीहे (Heihe) रिशियातील शहर ब्‍लागोवेशचेंस्‍क (Blagoveshchensk) प्रांतादरम्यान असलेल्या अमूर नदी (Amur River)असणार आहे. रशिया आणि चीन या देशांमधून वाहणारी अमूर नदी ही तब्बल 2900 किलोमीटर इतक्या लांबीची आहे. या नदीच्या काठावर दोन्ही देशांची सुमारे सात शहरं आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांमधील लोकांना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी छोटी नाव हे एमकमेव साधन होते. मात्र, छोटी नाव वापरुन प्रवास करताना दोन्ही देशांच्या नागरिकांना प्रचंड अडचणी येत होत्या. मात्र, आता केबल कारच्या सहाय्यामुळे दळनवळन करणे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी सोपे आणि सोईचे होणार आहे. (हेही वाचा, Dokdo Islands: दक्षिण कोरिया-जपान यांच्यातील वादग्रस्त बेटावर एकटीच राहते ८१ वर्षांची महिला)

दरम्यान, दोन्ही देशांतील लोक जेव्हा या नदीतून छोट्या नावेने प्रवास करत असत तेव्हा खास करुन हिवाळ्यात त्यांना प्रचंड अडचण येत असे. कारण हिवाळ्यामध्ये या नदीचे पाणी गोठत असे व त्याचा बर्फ होत असे. केबल कार सेवेमुळे नागरिकांच्या अडचणीही सुटणार आहेत. तसेच, दोन्ही देशांतील नागरीकांसाठी पर्यटन व्यवसाय म्हणूनही या सेवेकडे पाहिले जात आहे.

केबल कारच्या प्रत्येक केबिनमध्ये एक मोठी सीट असेल. याशिवाय साहित्य वाहतुकीसाठी स्वतंत्र जागाही असणार आहे. ही कार प्रती 15 मिनिटांनी ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणांवर जाईल. या कारचे डिजाईन डच आर्किटेक्‍ट ने तायर केले आहे. केबल कार हा प्रवास आणि वाहतुकीचा एक नवा पर्याय म्हणून पुढे येत आहे.