शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल (Big Bull) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची एअरलाइन कंपनी अकासा एअरलाइन्स (Akasa Airlines) पुढील काही दिवसात आपली व्यावसायिक सेवा सुरू करणार आहे. 22 जुलै म्हणजे आज पासून फ्लाइट तिकीट बुकींगला (Flight Ticket Booking) सुरुवात करण्यात आली आहे. सध्या अकासा एअरलाईन्स ही देशांतर्गत विमान (National Airways) सेवा देणार असुन 2023 च्या उत्तरार्धात अकासा आंतराष्ट्रीय विमानसेवा (International Airways) सुरु करणार असल्याची माहिती अकासा एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे (Vinay Dubey) यांनी दिली होती. सध्या अकासा एअरलाइन भारतातील (India) मेट्रो शहर (Metro City) टिअर टू (tier two) आणि टिअर थ्री (tier three) शहरांवरील उड्डाणांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.
अकासा एअरलाइन्सचे पहिले विमान 7 ऑगस्ट 2022 पासून मुंबई (Mumbai) ते अहमदाबाद (Ahmadabad) या मार्गावर उड्डाण करणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दर आठवड्याला 28 साप्ताहिक (Weekly) उड्डाणे करतील. त्यानंतर अकासा एअरलान्स मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू (Bangalore), कोची (Kochi) या चार शहरांना जोडले जाणार आहे. तसेच दर महिन्याला दोन नवीन विमाने अकासा एअरलान्सच्या ताफ्यात समाविष्ट केली जातील, त्यानंतर टप्प्याटप्प्याने नेटवर्कचा (Network) विस्तार करताना आणखी शहरे जोडली जाणार आहे. (हे ही वाचा:-Airlines Offer : भारतातून ‘या’ देशात जाण्यासाठी करा फक्त 26 रुपयांत विमान प्रवास, एअरलाईन्स तर्फ प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर)
देशातील सर्वात मोठे अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या व्यवसायात सुमारे 3.5 कोटी डॉलरची(3.5 Crore Dollars) गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी मागील वर्षी विमान वाहतूक सेवेत उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर अनेकांच्या लक्ष झुनझुनवालांच्या विमान कंपनीच्या वाटचालीवर आहे. अकासा एअरलान्स किफायतशीर असणार आहे. अकासाद्वारे अधिकाधिक नागरिकांना विमान प्रवास करता यावा हा झुनझुनवाला यांचा उद्देश असल्याने विमान प्रवासाचे भाडे अत्यल्प ठेवण्यात येणार आहे. तसेच अकासा एअरलाइन्सने आपल्या विमान कंपनीकडून 72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे.