Siddhivinayak Ganapati Idol Live Darshan & Streaming Online For Ganeshotsav 2021: गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस! सिद्धीविनायक गणपती मंदिरातील लाईव्ह सोहळा येथे पाहा
Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

Shree Siddhivinayak Temple darshan LIVE Streaming for Ganeshotsav 2021: महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशाचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला शुक्रवारपासून (10 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. तसेच आज गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, घरगुती आणि सार्वजनिक मंडळात श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. महत्वाचे म्हणजे, या काळात मुंबईतील प्रसिद्ध मंदिर श्री सिद्धिविनायक येथे भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परंतु, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अद्याप बंदच आहेत.  ज्यामुळे भक्तांमध्ये निराशाजनक वातावरण पाहायला मिळते. मात्र, अशा भक्तांना श्री सिद्धिविनायक मंदिराचे घरबसल्या ऑनलाईनद्वारे श्री गणेशाचे दर्शन घेता येणार आहे.

कोरोना महामारीमुळे गणेश भक्तांना सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते. त्यामुळे भाविकांना ऑनलाईन द्वारे सिद्धिविनायक मंदिरातील लाईव्ह आरती पाहता येणार आहे. हे देखील वाचा- Ganeshotsav 2021: मोरगावचा मोरेश्वर'-अष्टविनायकामधील पहिला गणपती; मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व, घ्या जाणून

श्री सिद्धिविनायक मंदिरातील लाईव्ह-

 

गणेशचित्रशाळेतून गणपती घरी नेण्याची वेगळी परंपरा कोकणात पहायला मिळते. बाप्पाल घरी नेताना गणेशमुर्तीशाळेत पानाचा विडा सुपारी आणि दक्षिणा ठेवून गणपती बाप्पाचा जयघोष करुन आपल्या लाडका गणपती घरी घेवून जाण्यास सज्जा होतो.मात्र त्यात वेळी बाप्पाला गऱ्हाणे घालून कोकणात गणपती उत्सवाला सुरवात होते.