Makar Sankranti 2019: हिंदू संस्कृतीत प्रत्येक महिन्यात किमान एक सण तरी येतोच. पंचागानुसार प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. मकर संक्राती (Makar Sankranti) या सणालाही हिंदू पंचागानुसार वेगळे महत्त्व आहे. राशी भविष्य आणि पंचांग जाणकार सांगतात की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा विशेष संक्रांत तयार होते. या संक्रांतीला मकर संक्रांत म्हणतात. ही संक्रांत गृहमानाच्या स्थितीनुसार अनेकांसाठी लाभकारक तर काहींसाठी हानीकारक म्हणजेच कार्यात बाधा आणणारी असते, असे म्हणतात. यंदा मकर संक्रांतीचा प्रभाव सर्वच्या सर्व १२ राशींवर पडणार असे पंचांग आणि ज्योतिष अभ्यासक सांगतात. भारतातील प्रत्येक नागरिकाची रास ही मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींपैकी एक असते. तर, जाणून घ्या या बारापैकी तुमच्या राशीला (Zodiac feature) यंदाची संक्रांत कशी असेल.
मेष
मेष राशीसाठी यंदाची संक्रात लाभदाई ठरेल. आपल्या राशीच्या दहाव्या भागात सूर्याचा संचार होईल. तुमचे मालक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जसे की, तुम्ही एखादे वाहन किंवा जमीन, घर, दुकान खरेदी करु शकाल. व्यवसायात वृद्धी होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ
वृषभलाही ही संक्रात लाभदाई आहे. 14 जानेवारीला सूर्य मकर राशित प्रवेश करता होत असल्याने या राशीच्या मंडळींना नोकरीच्या ठिकाणी सफलता मिळू शकते. जून्या वादांपासून मुक्ती मिळू शकते. तसेच, प्रलंबित कामे मार्गी लागतील.
मिथून
मिथूनसाठी यंदाची संक्रांत संमिश्र ठरु शकतेच संक्रातीचा सूर्य मिथून राशीच्या आठव्या भागात संचार करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आरोग्याला जपावे लागेल. नोकरीत बदल होऊ शकतो. नोकरी नसलेल्या मंडळींना रोजगार मिळू शकेल. पर्यटनाचे योग.
कर्क
कर्क राशीच्या सातव्या घरात सूर्याचा प्रवेश. त्यामुळे शत्रूंपासून सावधानता बाळगा. सावधानता बाळगल्यास प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यवसायात समाधानकारक नसली तरी, जैसे थे स्तिथी राहण्याची शक्यता. शत्रू प्रबळ राहणार नाही. पण, तुमच्या कार्यात बाधा आणू शकतो.
सिंह
सिंह राशीसाठी यंदाची संक्रात कमालीची यशस्वी ठरु शकते. या राशीच्या सहाव्या भागात सूर्य प्रवेशर्ता झाल्याने लाभनिश्चितीचा योग. वादांवर तोडगा निघेल. धार्मिक कार्यास हातभार लागेल.
कन्या
समाजात मान सन्मान वाढेल. आर्थिक लाभात घट होईल. खर्च वाढेल. मात्र, प्रयत्न आणि कष्टाला बुद्धीची जोड दिल्यास आर्थिक वृद्धी हमखास. नियोजनपूर्वक पावले टाकल्यास यशाचा मार्ग सुखकर.
तूळ
व्यवसायात लाभ. इच्छाप्राप्तीचे संकेत. नोकरी, समाजकार्य, कौटुंबिक ठिकाणी पदोन्नतीची संधी.
वृश्चिक
नोकरीत वरिष्ठांपासून सावधान. संपत्ती लाभ आणि संपत्तीत वाढ. शब्दाला मान मिळेल.
(हेही वाचा, Makar Sankranti 2019 : जाणून घ्या यंदाची संक्रांत वेळ आणि महत्व)
धनू
कामाच्या ठिकाणी मतभेद टाळा. शिक्षणात सफलता. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता.
मकर
नोकरीच्या ठिकाणी श्रमाची तयारी ठेवा. मानसिक त्रास संभवतो. पर्यटन, परदेश दौऱ्याचा योग. सूर्याला जलदान करा.
कुंभ
व्यवसायीक गणिते जमतील. लोकसंपर्क वाढेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्यालाही जपावे लागेल.
मिन
आरोग्य उत्तम राहिल. आर्थिक प्रगती होईल. विरोधकांवर दबावाची खेळी करावी लागेल. शब्दांवर ठाम राहा. घेतलेला निर्णय फायदा मिळवून देण्याचे संकेत.