देशभरात 14 आणि 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल. सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती म्हणतात. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ‘मकर-संक्रांती’ साजरी केली जाते. हे सूर्याचे उत्तरायणदेखील असते. यावर्षी सूर्य 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटाला मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे यावर्षी 15 तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाईल. सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनेचा काळ सुरू होतो. या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापना, गृहनिर्मिती, यज्ञ-कर्म आदी पुण्यकर्मे केली जातात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या या पुण्यकाळात दानधर्मालाही महत्व आहे.
यावर्षी संक्रांती वाहन सिंह आणि उपवाहन गज (हत्ती) असेल. वर्ष 2019 मध्ये संक्रांती श्वेत वस्त्र धारण करून, स्वर्ण-पात्रात अन्न ग्रहण करत, कुंकवाचा लेप घेत उत्तर दिशेकडे जाताना दिसत आहे.
संक्रांतीच्या काळात विधिवत पूजा करून दानधर्म करावा, स्त्रियांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरावी. ऐपतीप्रमाणे वाण लुटावे. याकाळात पुण्यस्नानाचेही महत्व आहे. स्नानाचा पुण्य काळ 14 जानेवारी 2019 रात्री 2 वाजून 20 मिनिटापासून, 15 जानेवारी 2019 संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटापर्यंत राहील.
सूर्याच्या या संक्रमणाचा मकर राशीसोबत इतर राशींवरही प्रभाव पडतो. चला पाहूया या संक्रांतीचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडेल.
- मेष - धनलाभ
- वृषभ - हानी
- मिथुन - लाभ
- कर्क - कार्यसिध्दी
- सिंह - पुण्य लाभ
- कन्या - कष्ट व वेदना
- तूळ - सन्मान व प्रतिष्ठा प्राप्ती
- वृश्चिक - भय व व्याधी
- धनू - यश
- मकर - विवाद
- कुंभ - धनलाभ
- मीन - कार्यसिध्दी