Unwanted Pregnancy: मानसिक, आर्थिक किंंवा अन्य कोणत्याही कारणाने गर्भधारणा नको असेल तर अलिकडे गोळ्या औषधे घेण्याचा पर्याय निवडला जातो, मात्र या गोळ्यांंचा मारा केल्यास भविष्यात गर्भधारणेची इच्छा असल्यासही सकारात्मक परिणाम येणे शक्य होत नाही त्याही पेक्षा भीषण म्हणजे महिलेच्या शरीरावर यांंचा गंंभीर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल की हे समस्या आताच्या पिढीतील आहे तर तसं अजिबात नाहीये, यापुर्वीच्या काळातही अनेक महिला औषधे न घेता गर्भधारणा मुद्दाम टाळायच्या. विज्ञान किंंवा रेडिमेड उपाय उपलब्ध नसल्याने या महिला अगदी नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा टाळायच्या. आज आपण हे उपाय नेमके कोणते होते हे जाणुन घेणार आहोत.. Anal Sex Cause Pregnancy? अॅनल सेक्स मुळे गरोदर राहण्याचा किती टक्के चान्स आहे जाणुन घ्या
मगरीची विष्ठा
गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वात पहिला उपाय होता मगरीची विष्ठा, 1850 मध्ये मिस्त्र येथे सापडलेल्या अनेक कागदपत्रात याचा उल्लेख आहे की महिला पुरुषांंच्या स्पर्मचा आपल्या योनीत प्रवेश होउ नये यासाठी मगरीची विष्ठा योनीमार्गावर लावत होता, यात मध आणि सोडियम बायकार्बोनेट सुद्धा मिसळुन वापरले जायचे.
लीड आणि मर्क्युरी
गर्भधारणा रोखण्यासाठी हा अत्यंंत धोकादायक मार्ग आहे, यामध्ये लीड आणि मर्क्युरी मिश्रण करुन ते पेय महिला घ्यायच्या, या मार्गाचा वापर मुख्यतः चीन मध्ये होत होता. वास्तविक याचा परिणाम गंंभीर होत असुन यामुळे गर्भाशय, किडनी आणि मेंंदु निष्क्रिय करण्याची ताकद होती.
प्राण्यांंचे हाड आणि अंडकोष
मध्य काळात असे मानले जायचे की जर का महिलेने आपल्या जांंघांंवर वीजल नावाच्या प्राण्याचे अंडाशय आणि एक हाड बांंधले तर त्यांंना गर्भवती राहण्याची भीती कमी व्हायची.
पारा सेवन
चीन मध्ये 4000 वर्षांंपुर्वी गर्भधारणा थांंबवण्यासाठी पारा आणि तेल मिश्रित करुन खाल्लं जायचं, चीन मध्ये लीड चं पाणी पिण्याची सुद्धा पद्धत होती. यामुळे इनफर्टिलिटी वाढुन गर्भधारणा अडवणुक व्हायची.
दरम्यान, हे सगळे उपायकारक असो वा नसो आपल्या शरीरासाठी अत्यंंत हानीकारक आहेत त्यामुळे आपण ही माहिती वाचल्यावर असे प्रयोग करायला जाऊ नका. गर्भधारणे बाबत तुमच्या समस्य असतील तर यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम ठरेल.