व्हॅलेंटाईन डे, (Valentine’s Day) जगभरातील अनेक जोडप्यांना एकमेकांप्रती असलेले प्रेम, आनंद आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी मानला गेलेला अधिकृत काळच जणून. जगभरातील असंख्य जोडपी व्हॅलेंटाईन डे साजरा(Valentine's Day Celebration) करतात. काही उत्साही जोडपी तर व्हॅलेंटाईन सप्ताहच साजरा करतात. अशा वेळी जोडप्यातील प्रत्येक जोडीदालाला या काळात एकच विचार असतो. व्हॅलेंटाईन डे गिफ्ट (Valentine’s Day Gift Ideas for 2023) काय द्यावे? तुमच्या मनातील विचार ओळखून आम्हीच म्हटलं.. चला आपल्याला या कामी थोडी मदत करावी. काही सूचवावे. जाणून घ्या व्हॅलेटाईन डे निमित्त गिफ्ट देण्यासाठी या हटके कल्पना.
जोडीदाराला गिफ्ट देताना विचार करा. केवळ एखादी वस्तू देणे म्हणजेच प्रेम व्यक्त करणे नव्हे. त्याही पलिकडे अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे तुमचा जोडीदार भलताच खूश होऊन जाईल. अर्थात तुम्हाला असे कोणीही असे म्हणत नाही की तुम्ही केवळ फ्लॉवर डिलिव्हरी शेड्यूल करू नका किंवा चॉकलेट गिफ्ट बॉक्स पाठवू नका. पण त्याही पलीकडे जाऊन काही हटके गिफ्टबाबत विचार केला तर? (हेही वाचा, Free Condoms: थायलंड पुरवणार 95 दशलक्ष मोफत कंडोम; व्हॅलेंटाईन डेच्या आधी Safe SEx ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न)
लक्षात ठेवा की आम्ही इथे सूचवलेल्या वस्तू, भेट या केवळ कल्पना आहेत. तुमच्या जोडीदाराला खरे तर तुम्हीच चांगले ओळखू शकता. त्यामुळे तुमची पसंती हा पहिला प्राधान्य क्रम असायला हवा.
वर्षभराचे वेळापत्रक
जोडीदार आणि तुम्ही मिळून तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करा. वर्षभर आपल्याला काय करायचे, कुठे फिरायला जायचे. काय खायचे, खरेदीवर किती पैसे खर्च करायचे. बचत किती आणि कशी करायची? याबात एक छान कॅलेंडरच आपण बनवू शकता. यात तुम्ही तुमचे विकेंडही निवडू शकता.
खास सबस्क्रिप्शन
आजकाल जमाना डिजिटल आहे. त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, जीम, वायफाय अथवा तसेच काहीतरी गिफ्ट देऊ शकता. तुम्ही तिच्या एखाद्या आवडत्या घटकाची वर्षभराची नोंदणी तिला करुन देऊ शकता. यात मोबाईल आणि इटरनेट, टीव्ही रिचार्जही किंवा पुस्तकाची ऑर्डरही येऊ शकते बरं.
सौंदर्य प्रसादने
आपण सुंदर दिसावे असे सर्वांनाच वाटते. त्यामुळे आजकाल केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही सौदर्य प्रसादने वापरतात. त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला एखादे सौदर्य प्रसादन नक्कीच देऊ शकता.
सोडून द्यायचे मुद्दे अर्थात Bucket List
जोडप्यांमध्ये अनेक कारणांवरुन ताणतणाव असतात. ज्यामुळे दोघांच्याही नात्यामध्ये अनेकदा दुरावा निर्माण झालेला असतो. अशा वेळी व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून दोघेही यावर विचार करु शकतात. दोघांमधील वादाच्या जागा, मुद्दे, विषय यावर चर्चा करुन दोघांनी मिळून ते सोडून द्यायचे. म्हणजेच बकेट लिस्टमध्ये टाकायचे. ज्यामुळे पुढचे आयुष्य अधिक आनंदाने व्यतीत करता येईल.