How to handle rejection in Love | (Photo credit: archived, edited, representative image)

How to handle rejection in Love: व्हॅलेंटाईन डे म्हटलं की अनेक प्रेमवीरांना उत्साहाचं भरतं येतं. मग हे प्रेम दुतर्फी असो की एकतर्फी. समोरच्याच्या मनात काहीही असो. आज विचारुनच टाकू. या इराद्याने ही मंडळी कामला लागतात. यात तो आणि ती अशा दोघांचाही समावेश असतो. काही लोक तर म्हणे कित्येक दिवस अगोदर रंगीत तालीमही करतात. अखेर तो दिवस उजाडतो. हा तोच दिवस असतो (14 फेब्रुवारी, Valentine) ज्याची हे प्रेमवीर अनेक दिवस वाट पाहात असतात. आजवरचा असला नसला सगळा अनुभव, मार्गदर्शन याचा पुरेपूर वापर करत ही मंडळी धीर एकवटतात आणि एकदाचे समोरच्याला विचारुनच टाकतात. काही लोक या प्रकाराला प्रपोज करणे असेही म्हणात. काही लोकांना अपेक्षितपणे समोरुन होकार येतो. ही मंडळी क्षणात आकाशाला जाऊन टेकतात आणि आनंद साजरा करण्याच्या तयारीला लागतात. पण, बहुतेकांच्या नशीबी नकार येतो. तुम्ही कधी विचार केला आहे काय? आपल्यालाही समोरुन नकार आला तर तो कसा स्वीकाराल? समोरच्याने नकार दिला. हरकत नाही. चला आम्ही सांगतो तो कसा स्वीकारायचा. कदाचित ही माहिती वाचल्यानंतर भविष्यातील आपला मार्ग अधीक यशस्वी ठरु शकेल.

गांगरु नका, नाराजही होऊ नका, प्रतिक्षा करा

प्रपोज करताना आपण आपल्या मनातील समोरच्याप्रती असलेली भावना आपण व्यक्त करतो. आता बाण आपल्या हातून निसटलेला असतो. आता निर्णय समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतो. हा निर्णय कधी पटकण मिळतो. कधी कळवतो असे सांगत थांबा आणि वाट पाहा धोरण राबविले जाते. अशा वेळी निर्णयाची वाट पाहा. समोरच्यावर आपले प्रेम आहे म्हणजे त्याचेही आपल्यावर आहेच किंवा असलेच पाहिजे असे नाही. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद आला नाही म्हणून नाराज होऊ नका. प्रतिसाद (उत्तर) आले नाही म्हणून कासाविस होऊ नका. किंवा आपण भलतेच बोलून बसलो नाही ना? असे म्हणून गांगरुन अथवा नाराज होऊ नका. समोरच्या व्यक्तीला पुरेसा वेळ द्या. तुम्ही तुमच्या कामाला लागाल. कोणावर अवलंबून राहू नका. समोरच्याचेही तुमच्यावर प्रेम असेल तर, प्रतिसाद येणार हे नक्की.

दु:खातून बाहेर पडा, करिअरची वाट धरा

प्रेमात समोरच्याकडून नकार मिळाला म्हणून नाराज होऊ नका. अर्थात, सर्व दु:खांपेक्षा हा चटका तात्कालीक असला तरी तो जरा अधिकच खोल असतो हे खरे. पण, समोरच्याने आपल्याला नाकारले म्हणून हळहळू नका. कदाचित ती व्यक्ती तुमच्यासाठी किंवा तुम्ही त्या व्यक्तीसाठी योग्य नव्हता. आपल्याला प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसेच समोरच्याला तो नाकारण्याचाही आहे. हे पक्के ध्यनात घ्या. कदाचित समोरच्या व्यक्तीचे दुसऱ्यावर प्रेम असू शकते. किंवा त्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तितके प्रभावी वाटले नसू शकता. काहीही असले तरी कारण शोधत बसू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती समझून सोडून द्या. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. कदाचीत तुमचे कर्तृत्व पाहून ती व्यक्ती स्वत:हून तूमच्या आयुष्यात परत येऊ शकते. (हेही वाचा, Happy Rose Day 2019: 'व्हेलेंटाईन वीक'ची सुरुवात Rose Day ने का होते?)

लक्षात ठेवा! प्रेत्येकासाठी कोणीतरी थांबलेले असते

तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जगातील एकमेव व्यक्ती आहात. त्यामुळे प्रेमात नकार मिळाला म्हणून नाराज नका होऊ. निसर्ग हा सृष्टीतील सर्वात मोठा आणि चतूर व्यवस्थपक आहे. त्याने मानवी समाजाची रचनाच अशी केली आहे की, शक्यतो कोणीही एकटं राहणार नाही. त्याने प्रत्येकाची जोडी जमवली आहे. इतकेच की, आपली जोडी कोणासोबत जमवली आहे हे कोणालाच माहिती नसते. त्यामुळे हे पक्के ध्यानात ठेवा की, प्रत्येकासाठी कोणीतरी थांबलेले आहे. निसर्गाने प्रत्येकाच्या जीवनाचा मार्ग ठरवून दिलेला असतो. आपण फक्त त्या मार्गावरचे वाटसरू आहोत. आपण आपले काम प्रामाणीकपणे करत रहायचे. योग्य वेळ येताच एक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्की प्रवेश करणार असते. भले तिचा मार्ग कोणताही असला तरी.

...तर ते नाते तुटतेच!

अनेकदा निसर्गाच्या मनात असलेली व्यक्ती न भेटता दोन भलत्याच व्यक्ती एकमेकांना भेटतात. त्यांच्यात नाते निर्माण होते. पण, हे नाते पुढे फार काळ टिकत नाही. अनेक जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे हेच तर खरे कारण आहे. पण, आपल्या व्याख्येनुसार आपण त्याला ब्रेकअप म्हणतो. निसर्गाने ठरवून ठेवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे हेच खरे प्रेम आहे. आणि निसर्गाने ठरवून दिलेली व्यक्ती भेटली की, तिच्या सोबतीने आयुष्य शेअर करने हे जीवन..! तेव्हा तुमच्या त्या व्यक्तीचा शोध घ्या. जी निसर्गाने तुमच्यासाठी ठरवून ठेवली आहे. कठीण आहे. पण, अशक्य नक्कीच नाही.