Valentine’s Day 2019: फेब्रुवारी महिन्यातील गुलाबी थंडी 'व्हेलेंटाईन डे' (Valentine Day) ची आठवण करुन देते. हा व्हेलेंटाईन डे केवळ एका दिवसापूरता मर्यादीत नसतो. तर आठवणाभर विविध 'डेज' च्या माध्यमातून सेलिब्रेशन केले जाते. ही परदेशी परंपरा भारतीयांनी देखील आत्मसात केली आहे. व्हेलेंटाईन वीकची सुरुवात 'रोज डे' (Rose Day) पासून होते. तर जाणून घेऊया या 'रोज डे' बद्दलच्या काही खास गोष्टी....
तरुण प्रेमी मनांचा उत्सव म्हणून जरी व्हेलेंटाईन डे कडे पाहिले जाते. पण याची सुरुवात 14 व्या शतकात झाली. खरं तर त्याही पेक्षा आधी म्हणजे तिसऱ्या शतकात ए. डी. सम्राट क्लॉडियस (AD empreor caludius) याने दोन माणसांना मारुन टाकण्याचा आदेश दिला होता. त्या दोघांचेही नाव व्हेलेंटाईन होते. त्यानंतर संत व्हेलेंटाईनने बहिष्कार केलेल्या कपल्सचे लग्न करुन दिल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आली होती. त्याच्या या बलिदानाची खूप चर्चा झाली आणि मग प्रेमाचा उत्सव सुरु झाला. Rose Day च्या दिवशी कोणत्या रंगाचं गुलाब तुमच्या मनातील कोणती भावना व्यक्त करते?
गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामुळे मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबांची निवड केली जाते. ही सुंदर फुले मनातील गोड भावना व्यक्त करतात. त्यामुळे व्हेलेंटाईन वीकची सुरुवात 'रोज डे 'ने होणे यात काहीच आश्चर्य नाही.