प्रत्येकाला आपापल्या प्रेमाचे कौतुक. अशा कौतुकांचा सोहळा साजरा करण्याचा जगभरात प्रचलित असलेला आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन विक. जगभरातील प्रेमी युगुलं व्हॅलेंटाईन विकमध्ये (Valentine Week 2021) येथेच्छ प्रेम व्यक्त करतात म्हणे. रोज डे पासून सुरु झालेल्या या सप्ताहाचा अत्युच्च शेवट व्हॅलेंटाईन डेने होते. रोज डे ते व्हॅलेंटाईन डे यांदरम्यान अनुक्रमे प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, हग डे (Hug Day 2021) , किस डे येत असतात. अर्थातच प्रत्येक दिवसाचे वेगळेच महात्म्य. त्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी जो अक्षरश: पाऊस पाडला जातो तो काही औरच. त्यामुळे आपल्यालाही आपल्या आवडत्या व्यक्तीस शुभेच्छा देऊन हग डे (Happy Hug Day 2021) निमित्त आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी खास HD Images इथे देत आहोत. ज्या आपण HD Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status म्हणूनही वापरु शकता.
जर तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जोडीदारासोबत नसाल तर सहाजिकच त्याला मिठीतही घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे सहाजिकच एकच पर्याय उरतो कोणत्या तरी माध्यमातून आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवणे. एचडी इमेजेस शुभेच्छा संदेश हा देशील त्यातलाच एक प्रकार. (हेही वाचा, Valentine Week 2021, Hug Day Wishes: ब्रिंग इट ऑन.. चला आलिंगनाला; SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून खास व्यक्तीसोबत साजरा करा 'हग डे')
व्हॅलेंटाईन सप्ताह हा तर प्रियकर प्रेयसी यांच्यासाठी खास पर्वणीच असतो. या काळात मिठी मारण्याचा खास उत्सवच काही मंडळी साजरी करतात. त्यात व्हॅलेंटाईन सप्ताहात हग डे हा विशेष दिवस साजरा केला जातो.