जगभरातील प्रेमी युगुलांसाठी एक उत्साह आणि उत्सावाचा काळ म्हणजे व्हॅलेंटाईन डे. अलिकडे तर व्हॅलेंटाईन डे येई पर्यंत युगुलं व्हॅलेंटाईन सप्ताह (Valentine Week)) साजरा करतात. त्यामुळे पूर्ण आठवडाभर प्रेमी युगुलांची मजा असते. पहिल्या दिवशी रोज डे, दुसऱ्या दिवशी प्रपोज डे, तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे, टेडी डे, हग डे (Hug Day) , किस डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन डे. आज या श्रृंखलेतील पाचवा दिवस म्हणजेच हग डे (Hug Day 2021) आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यापूर्वी आपण खासा भावाना शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करु शकता. या शुभेच्छा आपण आपल्या जवळच्या कोणाही व्यक्तीला देऊ शकता. त्यासाठी ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status इमेज इथे आपण पाहू आणि डाऊनलोड करु शकता.
व्हॅलेंटाईन सप्ताह हा तर प्रियकर प्रेयसी यांच्यासाठी खास पर्वणीच. या काळात मिठी मारण्याचा खास उत्सवच काही मंडळी साजरी करतात. त्यात व्हॅलेंटाईन सप्ताहात हग डे हा विशेष दिवस साजरा केला जातो. हग डे (Hug Day 2021) निमित्त जाणून घ्या अर्थ 'मिठी'चा. ब्रिंग इट ऑन.. चला आलिंगनाला, जोडीदाराला द्या खास गिफ्ट. (हेही वाचा, Valentine Week 2021, Hug Day Gift Ideas: ब्रिंग इट ऑन.. चला आलिंगनाला, जोडीदाराला द्या खास गिफ्ट; हग डे निमित्त जाणून घ्या 'मिठी'चा अर्थ)
व्हॅलेंटाईन विकमध्ये हग डे निमित्त काही खास इमेज
स्पर्श प्रेमाचा
हवाहवा वाटतो..
मिठीतला क्षण
हरघडी नवाच भासतो...
प्रेमाला नसते सीमा
निसर्गाचा तो अनमोल ठेवा
मिठीत घ्यावा..
क्षण क्षण अनुभवा..
नाही कळायची ती ओढ
आपूलकीची प्रेमाची...
मायेची.. ममतेची..
मिठीतल्या श्वासांची..
तुझ्या मिठीत सख्या रे
घडीलाही वेळ कळेना..
काट्यांवरती चढले काटे...
मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे
आठवणीतील मिठी
कातरवेळी छळते आहे..
तुला बहुदा नसेल माहित
आता हे रोजच घडते आहे..
व्हॅलेंटाईन सप्ताहात हग डे निमित्त गळाभेटीला अत्यंत महत्त्व असते. अशा वेळी नाते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे. नाते नैतिक असो वा अनैतिक. नाते सर्वसामान्य असो किवा व्यावसायिक. या सर्वात अधिक दृढता आणते ते आलिंगन. सरळ साध्या सोप्या भाषेत मिठी अथवा गळाभेट. गळाभेट कोण कोणासोबत घेतं यावरही बरंच काही अवलंबून असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश-विदेशातील राष्ट्रप्रमुखांना मारलेली मिठी ही गळाभेट ठरते. पण प्रेयसिने प्रियकराला मारलेली मिठी हे आलिंगन ठरते. दोन मित्र किंवा योद्धे (जिंकल्यावर) जेव्हा एकमेकांची गळाभेट होते त्यालाही आलिंगन म्हणतात.