रिलेशनशीप हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग. त्यात काही चढ-उतार झाले तर त्याचा परिणाम व्यक्तिगत किंवा व्यावसायिक आयुष्यावर होत असतो. नात्यातील ब्रेकअपचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. पण ते प्रत्येकाच पचवता येते असे नाही. मग मनातील भावना प्रकट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडले जातात. ब्रेकअपनंतर मुली काय करतात. त्यांच्या कृतीमागे नेमका काय अर्थ असतो? जाणून घेऊया...
मित्रांना वेळ देणे
ब्रेकअपनंतर मुली आपले मन हलके होण्यासाठी खास फ्रेंड्सचा आधार घेतात. मनातल्या सर्व गोष्टी मित्रांसोबत शेअर केल्यानंतर त्यांना थोडे रिलॉक्स वाटते. आपल्याला कोणीतरी समजून घेणारे आहे ही बाब त्यांना सुखावते.
मित्रांकडून मदत घेणे
एक्स बॉयफ्रेंडच्या अफेअर्सबद्दल जाणून घेण्यासाठी, तो सध्या काय करतो, त्याला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मुली मित्रांची मदत घेतात.
सोशल मीडियावर ब्लॉक करणे
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर बॉयफ्रेंडला ब्लॉक करुन अनब्लॉक करणे हे तर मुलींचे रोजचेच काम असते. वेगळे झाल्यानंतर तो काय काय करतोय, हे जाणून घेण्यासाठी मुली असे करतात.
मनातील चीड व्यक्त करणे
मनातील राग, चीड व्यक्त करण्यासाठी मुली अनेक पर्याय निवडतात. ब्रेकअपचे दु:ख हलके करण्यासाठी बॉयफ्रेंडला फोन मेसेज करुन मुली खूप सूनावतात.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह
ब्रेकअपनंतर मुली सोशल मीडियावर खूप अधिक अॅक्टीव्ह होतात. यामागे दोन कारणे असतात. एक्स बॉयफ्रेंडवर सोशल मीडियाद्वारे नजर ठेवण्यासाठी त्याचबरोबर ब्रेकअपनंतर देखील मी किती खूश आहे, हे एक्स बॉयफ्रेंडला दाखवून देण्यासाठी हा आटापीटा केला जातो. ब्रेकअपनंतर एक्ससोबत मैत्री करताना या '३' चुका टाळा!
शॉपिंग
अनेक मुली ब्रेकअपनंतर अधिक शॉपिंग करु लागतात. स्ट्रेस दूर करण्याचा हा प्रयत्न असतो. त्याचबरोबर काही मुली इतर मुलांसोबत फ्लर्ट करतात. कारण त्यामुळे जलसी वाटून एक्स बॉयफ्रेंड तिच्याकडे परत येईल.