![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/09/ranbir-kapoor-deepika-padukone-784x441-380x214.png)
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे एक खास स्थान असते. पण प्रेमाचे नाते तुटल्यावर खूप त्रास होतो. त्याचबरोबर ब्रेकअपनंतर फक्त फ्रेंड्स म्हणून राहणे देखील काहीसे अवघड होते. कारण जुन्या गोष्टी, आठवणी ताज्या होतात. आयुष्यात मुव्ह ऑन होणे काहीसे कठीण होते. खूप कमी लोकांना फक्त मित्र म्हणून नाते टिकवणे शक्य होते. पण खरंच जर तुम्हाला एक्स सोबत मित्र म्हणून राहायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
जुन्या गोष्टी आठवू नका
ब्रेकअपनंतर कधीही एक्ससोबत जुन्या गोष्टींवर बोलू नका. अशामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. आणि त्यामुळेच तुमच्या मैत्रीवर पाणी फिरू शकतं.
नव्या पार्टनरबद्दल बोलणे टाळा
एक्ससोबत नव्याने झालेली फ्रेंडशीप टिकवण्यासाठी त्याच्या/तिच्या लव्हलाईफबद्दल काहीही विचारु नका किंवा तुमच्या नव्या नात्याबद्दल फार काही बोलू नका. त्यामुळे दोघांपैकी एकजण किंवा अगदी दोघेही भावूक होण्याची शक्यता आहे. परिणामी तुमचा मैत्रीचा प्रयत्न अयशस्वी होऊ शकतो.
पॅचअप
अनेकदा पटत नाही म्हणून वेगळे झालेले कपल्स चांगले फ्रेंड्स होतात. मैत्री चांगली आहे , म्हणून पुन्हा पॅचअप करण्याचा प्रयत्न केला जातो. पण कदाचित हा निर्णय दोघांसाठीही चुकीचा ठरु शकतो.