Smelly Penis: लिंगाला येणारी दुर्गंधी घालवू शकते Sex मधील मजा; जोडीदाराला खुश करण्यासाठी जाणून घ्या उपाययोजना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

विचार करा, आपण आपल्या जोडीदाराबरोबर बेडवर आहात, दोघेही लैंगिक सुखाचा (Sex) अनुभव घेत आहात. परंतु त्यादरम्यान आपल्या जोडीदाराने आपल्याला सांगितले की, आपल्या लिंगाला दुर्गंधी (Smelly Penis) येत आहे, त्यावेळी आपली प्रतिक्रिया काय असेल? खचितच कोणत्याही पुरुषासाठी ही गोष्ट लाजिरवाणी ठरू शकते. यामुळे तो क्षणही खराब आणि होईल आणि पुढे सेक्स करण्याची इच्छाही मारून जाईल. मात्र खरच तुमच्याही प्रायव्हेट पार्टला दुर्गंधी येत असेल, तर त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर ओरल सेक्स (Oral Sex) करताना तुमच्या जोडीदाराच्याही फायद्याचे आहे.

लिंगाची दुर्गंधी सूचित करते की, आपण आपल्या खाजगी भागाच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. लैंगिक स्वच्छतेशी संबंधित पुरुषाच्या जननेंद्रियातून वास येणे ही एक मोठी समस्या आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपण आपला खाजगी भाग नियमितपणे स्वच्छ न केल्यास, आपल्या गुप्तांगांच्या आसपास बॅक्टेरियाचा धोका उद्भवू शकतो.

दुर्गंधीयुक्त प्रायव्हेट पार्टस हे फक्त जोडीदारासमोरच तुम्हाला लाज आणू शकत नाहीत, तर त्याचा तुमच्या लैंगिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपण देखील या प्रकारच्या समस्येने ग्रस्त असाल, तर आज आम्ही या समस्येची कारणे, लक्षणे आणि उपाययोजना सांगत आहोत.

कारणे व लक्षणे -

यासाठी Smegma व्यतिरिक्त इतरही काही कारणे आहेत, ज्यामुळे पुरुषाच्या जननेंद्रियातून वास येण्याची समस्या उद्भवू शकते. आपल्याला गोरोनिया (Gonorrhoea), क्लॅमिडीया (Chlamydia),, बॅलेनिटिस (Balanitis), यीस्टचा संसर्ग (Yeast Infection) मुळे ही समस्या उद्भवू शकते. या समस्येमध्ये आपल्याला लघवी करताना खाज सुटणे, लालसरपणा, सूज येणे, जळजळ होण्याची लक्षणे दिसू शकतात.

उपाययोजना -

> सेक्स आधी आपले प्रायव्हेट पार्टस स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक आहे. पुरुषांनी साबण अथवा इंटीमेट वॉशचा वापर करून, शिश्नावरची त्वचा मागे सारून शिश्निका स्वच्छ करा. तसेच आपल्या लिंगावर कोणतेही इन्फेक्शन, खाज किंवा इतर त्वचेचे आजार नाहीत ना ते पाहावे.

> सेक्स करताना नेहमी कंडोम वापरा. लक्षात ठेवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे अवांछित गर्भधारणेसह एसटीआयचा धोका देखील वाढतो.

> संभोगानंतरही आपल्या खासगी भागाची पूर्णपणे स्वच्छता करणे विसरू नका.

> रोज फक्त कोरड्या अंडरवेअरच वापरा. अंघोळीनंतर ओल्या प्रायव्हेट पार्टसवर अंडरवेअर घालू नका. लिंगाजवळील जागा कपड्याने पुसून कोरडी करा.

> घट्ट अंडरवेअर घालणे टाळा, तरीही जर तुम्ही घट्ट अंडरवेअर घातली, तर घरी आल्यावर ती लगेच काढा व त्यानंतर तो भाग स्वच्छ करा.  (हेही वाचा: Oral Sex मुळे वाढू शकते प्रणयाची मजा; मात्र मुखमैथुन करण्याआधी घ्यायला हवी 'ही' काळजी)

> नेहमी आपल्या प्रायव्हेट पार्टस सभोवतीचे केस काढणे किंवा ते बारीक करणे गरजेचे आहे. बरेचवेळा या केसांच्या अस्वच्छतेमुळे लैंगिक आजार होण्याची शक्यता असते.

यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे, एचआयव्ही सोबतच ओरल सेक्समधून हरपीझ होण्याची शक्यता असते. हरपीझ हा कॉमन सेक्सुअल डिसिझ आहे. याचा परिणाम तुमच्या प्रायव्हेट पार्टस सोबत त्वचेवरही होतो. त्यामुळे आपण सेक्स करत असणारा पार्टनर हायजनिक आहे का नाही ते तपासून घ्यावे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)